लघुपटांची वारी ‘झी टॉकीज’ आणणार तुमच्या दारी

zee talkies shortfilms

लघुपटांची वारी झी टॉकीजआणणार तुमच्या दारी

‘टॉकीज लाईट हाऊस’ सारखा अनोखा उपक्रम घेऊन आलेल्या ‘झी टॉकीज’ने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक हटके संकल्पना राबवल्या. ‘टॉकीज लाईट हाऊस’ लघुपट स्पर्धा ही

त्यापैकी एक. या लघुपट स्पर्धेला रसिकांचा मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर आता ‘झी टॉकीज’ तुमच्या दारी येऊन लघुपट पाहण्याची व तुमच्या मनातली गोष्ट मांडण्याची सुवर्णसंधी तुम्हाला देणार आहे.

आतापर्यंत हजाराहून अधिक प्रेविशिका या लघुपट स्पर्धेसाठी आल्या असून यापुढील टप्प्यात ‘झी टॉकीज’ तुमच्या दारी येऊन तुम्हाला लघुपट पाहण्याची व मनातील कथा सांगण्याची संधी देणार आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिक शहरापासून झाली असून या पुढचा दौरा पुणे, सावंतवाडी, मालवण, कोल्हापूर लातूर, अमरावती या शहरांत होणार आहे. हे लघुपट पहाण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

‘झी टॉकीज’ च्या या लघुपट स्पर्धेने व्यासपीठ उपलब्ध करून देत गुणवंतांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांनी आपल्या लघुपटाची एन्ट्री www.Zeetalkies.com या वेबसाईटवर करावी. या स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकाला आपल्या लघुपटाकरिता ‘झी टॉकीज’चं व्यासपीठ व लाखांची बक्षिस जिंकण्याची संधी मिळेल. दौऱ्याच्या दरम्यानही लघुपटाची एन्ट्री करणाऱ्य स्पर्धकाला आकर्षक भेट मिळणार आहे.

दौऱ्याचा तपशील कार्यक्रम पुढीलप्रमाणे

तारीखशहरस्थळवेळ
४ मार्चनाशिककेटीएचएमसकाळी ११.०० ते  सायं ७.००
४ मार्चनाशिकत्रिमूर्ती चौकसकाळी ११.०० ते  सायं ७.००
४ मार्चनाशिककॉलेज रोडसकाळी ११.०० ते  सायं ७.००
६ मार्चपुणेओझोन मॉलसकाळी ११.०० ते  सायं ७.००
६ मार्चपुणेपौड रोडसकाळी ११.०० ते  सायं ७.००
६ मार्चपुणेस्नेक पार्कसकाळी ११.०० ते  सायं ७.००
८ मार्चसावंतवाडी / मालवणलेकसकाळी ११.०० ते  सायं ७.००
८ मार्चसावंतवाडी / मालवणसावंतवाडी मार्केटसकाळी ११.०० ते  सायं ७.००
८ मार्चसावंतवाडी / मालवणमालवण बस स्टॉपसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१० मार्चकोल्हापूरपर्वती मल्टीप्लेकससकाळी ११.०० ते  सायं ७.००
१० मार्चकोल्हापूरराजाराम कॉलेजसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१० मार्चकोल्हापूररंकाळा लेकसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१२ मार्चलातूरहनुमान चौकसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१२ मार्चलातूरदयानंद कॉलेजसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१२ मार्चलातूरपी व्ही आर टॉकीजसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१४ मार्चअमरावतीमाळगी नगर चौकसकाळी ११.०० ते  सायं ७.००
१४ मार्चअमरावतीशेगांव नाकासकाळी ११.०० ते  सायं ७.००
१४ मार्चअमरावतीपंचवटीसकाळी ११.०० ते  सायं ७.००
Loading...
SHARE