ख्यातनाम दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची लघुपट कार्यशाळा

umesh kulkarni 2

ख्यातनाम दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची लघुपट कार्यशाळा

अरभाट फिल्मस् तर्फे येत्या ७ जानेवारी ते १० जानेवारी २०१६ दरम्यान ‘शूट अ शॉर्ट’ या लघुपट-निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत चार वेळा अयोजीत करण्यात आलेल्या कार्याशाळेच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाच्या वर्षात पाचव्यांदा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’, ‘हायवे-एक सेल्फी आरपार’ या आशयसंपन्न चित्रपटांद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी या कार्याशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

umesh kulkarni 2 या संदर्भात बोलताना उमेश कुलकर्णी म्हणालेत कि “डिजिटल तंत्रज्ञान आल्यामुळे चित्रपट बनवणे हि गोष्ट तांत्रिकदृष्ट्या जरी सोपी झाली असली, तरी एक माध्यम म्हणून प्रभावीपणे लघुपट तयार करणे हि आव्हानात्मक गोष्ट आहे.” लघुपट तयार करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना या कार्यशाळेमध्ये लघुपट-निर्मिती प्रक्रीयेबाबत सर्वसमावेशक असे मार्गदर्शन केले जाणार आहे. लघुपट तयार करण्यासाठीची आवश्यक पूर्वतयारी शुटींग आणि त्यानंतर लघुपट पूर्ण होईपर्यंतची कार्यपद्धती कशी असावी, त्याचबरोबर कल्पना मनामध्ये येण्यापासून ते लघुपट पूर्ण होईपर्यंतचा प्रवास, कलाकार आणि तंत्रज्ञयांच्यासोबतची कार्यपद्धती अशा विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. लघुपट निर्मितीत रस असणाऱ्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी हि कार्यशाळा खुली असणार आहे.

umesh kulkarni 1पूर्ण लांबीच्या चित्रपटांची यशस्वी निर्मिती करत असतानाच उमेश कुलकर्णी सातत्याने लघुपट निर्मिती करत आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा दर्जेदार लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी बहुतांश लघुपट भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था, पुणे यांच्यासाठी बनवल्या हेत. येथे विद्यार्थी असताना त्यांनी बनवलेल्या ‘गिरणी’ या लघुपटास २००५ साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘थ्री ऑफ अस’ या लाघुपटासाठी त्यांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच ‘गारुड’ या त्यांच्या लघुपटास मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात सुवर्णकमळ देऊन गौरविण्यात आले होते. थायलंड येथील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, केरळ येथील आंतरराष्ट्रीय माहितीपट व लघुपट-महोत्सव आणि फ्रांस येथील नामांकित ‘क्लेरमॉ फेरॉ’ या लघुपट महोत्सवामध्ये उमेश कुलकर्णी यांना परीक्षक म्हणूनही आमंत्रित करण्यात आले होते. तसेच ‘क्लेरमॉ फेरॉ’ तर्फे त्यांच्या सर्व लघुपटांचे विशेष प्रदर्शनहि आयोजित करण्यात आले होते. हि कार्यशाळा साठे कॉलेज ऑडीटोरीअम, विले-पार्ले इस्ट येथे दिनांक ७ जानेवारी ते १० जानेवारी २०१६ रोजी.स. ९:३० ते सं. ५ या वेळेत होईल. कार्यशाळेच्या अधिक माहितीबाबत संपर्क: ९१६७६१९५४९, ९१६७६७७८०१, ९६२३४४८५०३
इमेल: [email protected]


 

Loading...
SHARE