विश्वास चित्रपटाचे गीतध्वनीमुद्रण

विश्वास चित्रपटाचे गीतध्वनीमुद्रण

सद्गुरू प्रॅाडक्शन या चित्रपटनिर्मिती संस्थेद्वारे तयार होणाऱ्या विश्वास या मराठी सिनेमातील चार गीतांचे गीतध्वनीमुद्रण नुकतंच करण्यात आलं. कैलास उंडे पाटील निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश दरक करणार आहेत. रविंद्र साठे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू अरोरा, वैशाली माडे, रोहित राउत या दिग्गजांच्या आवाजातील गाणी व नंदू होनप याचं संगीत हे विश्वास चित्रपटाचे एक वैशिष्ट्य ठरावे. या चित्रपटाच्या सर्व गीतरचना रूपा कुलकर्णी यांच्या आहेत.

 रविंद्र साठे यांनी या चित्रपटातील ‘नशीबाची थट्टा झाली, डाव संपला’ हे विरह गीत गायलं आहे. तर ‘माथ्यावरचे  कुंकु तू जपशील का’? हे  दुसरं गीत वैशाली माडे यांनी रोहित राऊत यांच्या साथीने स्वरबद्ध केलं आहे. आपल्या मधाळ आवाजाने अनेक हिट गाणी देणाऱ्या वैशाली सामंत यांनी यातील ‘पोपट पिसाटला’ हे आयटम सॉंग  गायलं आहे. ‘तुझ्या माझ्या प्रीतीच झेपावलं पाखरू’ हे प्रेमगीत जान्हवी प्रभू अरोरा व स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे.

 विश्वास चित्रपटातील गीते रसिकांना नक्कीच भावतील असा विश्वास निर्माते कैलास उंडे पाटील व दिग्दर्शक नागेश दरक यांनी व्यक्त केला आहे. रमेश भाटकर, विनय येडेकर, मधु कांबीकर, गिरीजा प्रभू, सागर पडोले, प्रगती नाईक, हर्षदा गुप्ते या कलाकारांच्या विश्वास चित्रपटात भूमिका आहेत. छायाचित्रण सुधाकर रेड्डी यांचं आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते सागर पडोले व अजित सहानी आहेत.

Read This Article In English — Click Here


 

Loading...
SHARE