इंजिनिअरींगची नोकरी सोडून सुरू केली जगा वेगळी शेती, आता वर्षाला 5 लाखांपेक्षा जास्त करतो कमाई!

पानीपत/गुड़गांव: गुडगांवच्या फरूखनगर तहसीलमधील जमालपुरमध्ये राहणा-या विनोद कुमारने इंजिनिअरींगची नोकरी सोडून मोत्यांची शेती सुरू केली आहे. या शेतीतून तो आज 5 लाख रूपयांपेक्षा जास्त वार्षिक कमाई करत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दुस-यांना ही शेती कशी करावी याचं प्रशिक्षणही ते देतात. आज त्याच्याकडे या शेतीची माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण येत आहे.
विनोद कुमारचं वय 27 वर्ष आहे. त्याने सांगितलं की, त्याने 2013 मध्ये मानेसर पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमधून डिप्लोमा घेतला. त्यानंतर दोन वर्ष नोकरी केली. त्याचे वडीलही शेतकरी होते. प्रायव्हेट नोकरी करता करता त्याला शेतीत इंटरेस्ट होता. इंटरनेटवर आधुनिक शेतीची माहिती घेता घेता त्याला मोत्यांच्या शेतीची माहिती मिळाली. त्यानंतर याबाबत आणखी माहिती घेतल्यावर त्याला कळले की, कमीत कमी पैशांमध्ये आणि कमीत कमी जागेत ही शेती केली जाऊ शकते.त्यानंतर त्याने देशातील मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण देणा-या एकमात्र सेंट्रल इन्स्टिट्य़ूत ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर भुवनेश्वर येथून एका आठवड्याचं प्रशिक्षण घेतलं आणि लहान जागेत मोत्यांची शेती सुरू केली.
कशी करता येते मोत्यांची शेती?* विनोद कुमारने सांगितले की, ‘ही शेती सुरू करण्यासाठी पाण्याच्या टॅंकची गरज असते. मेरठ, अलीगढ येथून 5 रूपये ते 15 रूपयांमध्ये शिंपले विकत घेतले जाऊ शकतात. मच्छिमारांकडे ते सहज मिळतात.
* या शिंपल्यांना 10 ते 12 महिने पाण्याच्या टॅंकमध्ये ठेवले जाते. जेव्हा शिंपल्याचा रंग सिल्व्हर होतो तेव्हा त्यात मोती तयार झाला असे समजावे.
* यासाठी लागणारा पूर्ण सेटअप उभा करण्यासाठी साधारण 60 हजार रूपयांचा खर्च येतो.* मुख्य काम आहे शिंपल्यांची सर्जरी!
या शेतीत सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिंपल्यांची सर्जरी करणे ही होय. यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं. एका शिंपल्यामध्ये दोन मोती तयार होऊ शकतात.
* जशी आकृती या शिंपल्यामध्ये ठेवली जाते तसा मोती त्यात तयार होतो. विनोद भगवान गणेश, शिव, 786 आदींचे मोती तयार करतात.
* 300 ते 1500 रूपयांमध्ये विकला जातो एक मोती:
* विनोदने सांगितले की, मोत्यांची किंमत त्यांची क्वालिटी पाहून ठरते. एक मोतीची किंमत 300 रूपयांपासून 1500 रूपयांपर्यंत मिळू शकते. याचं मार्केट सूरत, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कलकत्तामध्ये आहे. विदेशातही या मोत्यांना मोठी मागणी आहे. ज्यांच्याकडे मोत्यांचं उत्पन्न जास्त येतं ते परदेशात ते पाठवू शकतात.