विजय कदम यांची ‘खुमखुमी’ दक्षिण आफ्रिकेत

vijay-kadams-khumkhumi-in-south-africa

विजय कदम यांची ‘खुमखुमी’ दक्षिण आफ्रिकेत

आपल्या सहजसुंदर विनोदांनी प्रेक्षकांना दिलखुलास हसविणारे महाराष्ट्राचे बहुरंगी, बहुढंगी लोकप्रिय कलाकार विजय कदम ‘खुमखुमी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेतील मराठी रसिकांच्या भेटीस जोहॅन्सबर्गला पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका मराठी मंडळाच्या सौजन्याने ‘खुमखुमी’ कार्यक्रमाचे आयोजन १६ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता ‘द मार्केट लॅब्रोटरी’ थिएटर येथे करण्यात आले आहे. निखळ हास्याची मेजवानी असणाऱ्या विजय कदम यांच्या आगळ्या वेगळ्या ‘खुमखुमी’ स महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली असून दक्षिण आफ्रिकेतील तमाम मराठी रसिकजन या रंगतदार मराठमोळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत.

यावेळी विजय कदम यांच्यासोबत कवी, लेखक आणि नाटककार श्री. मोहन भोईर सहभागी होणार आहेत. आगरी भाषा आणि नाटके दर्जेदारपणे सादर करून आगरी भाषा जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अपार  मेहनत  घेतली आहे. ‘खुमखुमी’ कार्यक्रमाच्या सादरीकरणाठी दक्षिण आफ्रिकेतील मराठी मंडळाचे सर्व पदाधिकारी ऊत्साहाने सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवठेमहांकाळ येथील सधन शेतकरी चंद्रजीत पाटील यांनी बहुमोलाचे सहकार्य केलंय.


 

Loading...
SHARE