परदेशातही, वजनदारचे ‘वजन’ !

vazandar-shines-outside-india-too

परदेशातही, वजनदारचे ‘वजन’ !

११ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या, निर्माती विधि कासलीवाल यांच्या ‘लॅन्डमार्क’ फिल्म्सच्या’, ‘वजनदार’ ह्या चित्रपटाचे महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतही जोरदार ‘वजन’ पडत आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर ह्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा असून, चित्रपटाच्या या सुंदर विषयामुळे भारता बाहेरही चित्रपटाला जोरदार  मागणी आली आहे. मुळातच शरीराने  बारीक असणे म्हणजेच सुंदर अशी समाजात मानसिकता असताना, हा चित्रपट स्वतःबद्दल वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या हा विचार खूप परिमाणकारकपणे  मांडला आहे.

अमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे दाखवण्यात आलेला हा चित्रपट तेथील लोकांना खास भावला असून, लोकाग्राहस्तव अमेरिकेतील, डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस ऐन्जेलिस, कोलम्बस, हडसन आणि डल्लास ह्या शहरांमध्ये सुद्धा शोजचे आयोजन करण्यात आले आहे. असाच एक शो कतार मध्ये सुद्धा झाला आणि त्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

ह्या चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापट ह्यांनी विशेष परिश्रम घेऊन आपले वजन त्या दोघींनी चक्क वाढवले आणि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर परत कमीही केले. शिवाय ह्या दोघींच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट ह्यांच्या बरोबर सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील आणि चेतन चिटणीस ह्यांचाही चित्रपटातील अभिनय उल्लेखनीय आहे.

चित्रपटाचं संगीत सुद्धा उल्लेखनीय असून प्रेक्षकांना ते मनापासून आवडते आहे . थोडक्यात काय तर, उच्च निर्मिती मूल्य असलेल्या ह्या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून जोरदार स्वागत होत आहे. ह्या चित्रपटाला परदेशातून सुद्द्धा मिळणाऱ्या भरगोस प्रतिसादामुळे, प्रादेशिक भाषेतील कलाकृतीचे महत्त्व आणि गुणवत्ता, भारता बाहेरही अधोरेखित होत आहे. त्यामुळे वजनदार मध्ये खरचं ‘वजन’ आहे हे सिद्ध झाले आहे !

Read This Article In English —> Click Here


Loading...
SHARE