पडद्या मागची वजनदार सई

vazandar-sai-tamhnakar-behind-scenes

पडद्या मागची वजनदार सई

प्रेक्षकांनी घडवलेली बोल्ड अँड ब्युटीफुल अशी छवी मागील काही चित्रपटातून सईने मोडीत काढली आहे. YZ मधली काकूबाई पर्णरेखा, जाऊंद्याना बाळासाहेब मधली गावरान भाषा बोलणारी आणि कुंभार काम करणारी करिष्मा किंवा फॅमिली कट्टा मधली धीर गंभीर मंजू, या प्रत्येक भूमिकेला सईने न्याय दिला आहे असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. वजनदार चित्रपटासाठी एक पाऊल पुढे टाकत सईने एक जबाबदार अभिनेत्री म्हणून आपल्या भूमिके पलीकडे जाऊनपडद्या मागील कामात देखील सक्रिय सहभाग घेतला.

शूट मधून 3 दिवसाचा ब्रेक मिळालेला असताना देखील आराम किंवा भटकंती न करता सईने तिचा संपूर्ण वेळ वजनदारच्या सेट वरच घालवला. आपली भूमिका आणि चित्रपट कसा सोईस्कर रित्या पूर्ण होऊ शकतो याचा जाणीवपूर्वक विचार करत सईने असिस्टंट डिरेक्शन आणि आर्ट डिरेक्शन या विभागांना सहकार्य केले. शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या व्यवस्थितच असल्या पाहिजे असा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा अट्टाहास असायचा, त्यामुळे आर्ट डिरेक्शन टीमला असिस्ट करणे सईसाठी सोपे नव्हते.फ्रेम सुंदर दिसण्यासाठी ज्या वस्तू आवश्यक असतात त्या वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सईने उत्तमरीत्या पार पाडली. त्याचसोबत रोज पॅक-अप झाल्यानंतर सई असिस्टंट डिरेक्टर्स सोबत बसूनपुढील दिवसाचं शेड्युल ठरवित असे,तसेच राहिलेले सीन्स वेळेत कसे पूर्ण करता येतील यावर मार्ग काढत असे. इतकंच नव्हे तर जेव्हा सई सोडून बाकीच्या कास्टचं शूटिंग चालू असायचं तेव्हाही सई असिस्टंट डिरेक्टर्स सोबत वॉकी टॉकी घेऊन सेटवर सूचना देत असे. सईलापडद्या मागच्या भूमिकेत पाहून शूटिंग बघायला आलेल्या लोकांचाउडालेला गोंधळपाहताना सई म्हणते, “शूटिंग पाहायला आलेले सर्वजण मला पडद्यामागे बघून खूपच आश्चर्यचकित झाले होते पण पडद्यामागे काम करताना मला कळलं कि ही सर्व कामं करताना किती संयम लागतो. कलाकारांच्या टँट्रम्समुळे सेटवरील कामावर कसावकितीपरिणाम होतो आणि त्यावेळी पडद्यामागे काम करणाऱ्या प्रेत्येक माणसाची भावना काय असते हे मला कळलं.आर्ट डिरेक्शन असो किंवा असिस्टंट डिरेक्शनही कामं मी काही अचिव्ह करण्यसाठी नाही केली तर उलट ही कामंकरताना एक कलाकार आणि एक पडद्यामागे काम करणारा कलाकार या दोन्हीही भूमिका मला अनुभवल्या मिळाल्या आणि त्या मला खूप काही शिकवून गेल्या.”

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE