आपल्या आवडत्या अभिनेते आणि अभिनेत्र्यांचा व्हॅलेंटाइन

व्हॅलेंटाइन

अभिनेत्री प्रार्थना बेहरे 

माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी सुदर स्वप्न आहे.

Prarthana Behereमी कॉलेज मध्ये असताना मला या दिवसाचं भरपूर आकर्षण होत. व्हॅलेन्टाईन डे ला कोणीतरी येतं, आपल्याला गुलाब देऊन प्रपोज करतं, असे काहीसे फिल्मी विचार माझ्या मनात यायचे. पण कॉलेज लाईफ नंतर ते सगळ बदललं. प्रेमासाठी सगळे दिवस समान असतात.  मात्र, परस्परांमध्ये प्रेम असूनदेखील ते व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळत नाही. नवरा-बायकोंमध्ये प्रेम हे असतंच, पण दोघांना ते व्यक्त करता यावं म्हणून असा हा खास दिवस असतो.  आपल्या अबोल भावनांना बोलते करण्यासाठी आणि नवरा बायकोचे नाते अजून घट्ट करण्यासाठी वेलेंटाईन डे गरजेचा आहे. माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न आहे, माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणणारा प्रिन्स चार्म मला हवा आहे. आणि हे सगळ वास्तवात घडणे शक्य नाही. त्यामुळे मी त्याला स्वप्नातच पाहणे पसंत करते. माझा ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ हा सिनेमा देखील प्रेमावर आधारित आहे. माझ्या प्रेक्षकांना तो नक्की आवडेल अशी मी आशा करते.

________________________________________________________________

अभिनेता गश्मीर महाजनी Ghashmir Mahajani photo

फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न असेल
यावर्षी ‘वन वे तिकीट’ या माझ्या आगामी फिल्मच्या शूटिंग मध्ये मी खूप बीझी आहे  या सिनेमाचे चित्रीकरण भारतात आणि भारताबाहेर होत असल्या मुळे  माझे शेड्युलिंग सध्या भरपूर टाइट आहे. त्यामुळे या दिवसासाठी वेगळं काहीतरी प्लान करण्याचा माझा सध्यातरी विचार नाहीये. येत्या वर्षात माझ्या काही सिनेमांचे देखील चित्रीकरण सुरु होणार आहे. तूर्तास, ‘वन वे तिकीट’ च्या शुटिंगमधून थोडा वेळ काढून बायको आणि फॅमिलीसोबत हा दिवस एन्जॉय करण्याचा प्रयत्न करेल. .

_______________________________________________________________

अभिनेता राकेश बापटRakesh Bapat

प्रेमाने जग जिंकता येते
‘व्हॅलेन्टाईन डे’ आपण दरवर्षी साजरा करतो. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी हा खास दिवस असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला इतके महत्व नसले तरी तरुणाई मध्ये या दिवसाची क्रेज जास्त पाहायला मिळते.  असे असले तरी, ‘व्हॅलेन्टाईन डे’ बद्दल मात्र माझी व्याख्या वेगळी आहे. आपल्याकडून दुखावले आणि दुरावले गेलेल्या लोकांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न मी या दिवशी करतो. माझ्या पत्नीचे देखील ‘व्हॅलेन्टाईन डे’ बद्दल हेच मत आहे. जीवनात आनंदी राहायचे असेल तर पहिले स्वतःचे नातेसंबंध जपा.  प्रेमाने जग जिंकता येते. अर्थात, त्यासाठी आपल्याला चांगला माणूस होण गरजेच आहे. पाश्चिमात्य देशातून आपल्या भारतात आलेला ‘व्हॅलेन्टाईन डे’ देखील हाच संदेश आपल्याला देतो. त्यामुळे जर दररोज प्रेमाने वागलो तर रोजच आपण हा दिवस साजरा करू शकू. कुटुंबातील नातेसंबंध जपा आयुष्य ‘वृंदावन’ सारखे सुंदर होईल. माझा आगामी ‘वृंदावन’ हा एक कौटुंबिक सिनेमा असून त्यात हाच संदेश देण्यात आला आहे.

_______________________________________________________________

अभिनेता चेतन चिटणीस 

प्रेमाची ‘फोटोकॉपी ‘Chetan Chitnis
प्रेमात पडण्यासाठी किवा प्रेम व्यक्त करण्यासाठी वेलेंटाइन्स डे खास दिवस असतो. नव्याने प्रेमात पडणा-या प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खूप स्पेशल असतो. प्रेमाच्या शोधात निघालेल्या अनेक तरुणांना हा दिवस प्रेरणादायी ठरत असला तरी, माझ्यामते वेलेंटाइन्स डे हा आपल्यावर प्रेम करणा-या सर्वांसाठी महत्वाचा असतो. आई-बाबा, बहिण-भाऊ आणि मित्र तसेच माझ्या सुख दुखात सहभागी होणा-या प्रत्येकांसाठी वेलेंटाइन्स डे असतो. प्रेमाची ‘फोटोकॉपी’ म्हणजेच हा दिवस! माझ्या आगामी ‘फोटोकॉपी’ या चित्रपटात अशीच एक प्रेमाची परिभाषा मांडली आहे. प्रेम केवळ दोन जीवांचे नसते तर नात्यांमध्ये देखील असते, आणि त्या प्रत्येकांसाठी हा वेलेंटाइन्स डे आहे.


Loading...
SHARE