“अनप्लग खय्याम” २६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन

khayyam

अनप्लग खय्याम सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमिताने संगीत रजनीचे आयोजन

२६ फेब्रुवारी शुक्रवार षण्मुखानंद हॉल सायन

वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड  लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड  लावले  होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशके आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून टाकणाऱ्या संगीतकार खेयाम यांचा ९० वा वाढदिवस या दिवशी साजरा केला जाणार आहे.

’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. या मुझिक शो चे आयोजन फालीसा इंटरटेनमेंट यांनी केले असून, त्यांना गझल गायक तलत अझीझ, भूपेंदर सिंघ, शिलाजा बेहेल, बेला सुलाखे या सारख्या दिग्गजाची. माननीय प्रसिद्ध गायक आणि राज्यमंत्री शहर विकास श्री बाबुल सुप्रियो मोलाची साथ लाभली आहे. “खय्याम यांच्यासाठी असा पहिलाच शो होत आहे आणि त्याचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला अभिमान आहे असे फालीशा इंटरटेनमेंट चे संचालक श्री संजय महाले नमूद करतात.

अनप्लग  खय्याम” 

दिनांक वेळ : २६ फेब्रुवारी २०१६ शुक्रवार, संध्याकाळी ७ ते १०

ठिकाण : षण्मुखानंद हॉल सायन

डोनर पासेस /तिकिटासाठी संपर्क :  षण्मुखानंद हॉल /www.ticketees.com


 

 

Loading...
SHARE