TTMM (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ गाणं रिलीज

TTMM TujhaTu Majha Mi First Song ‘Kshan Mohare’ Released

नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांचा आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. हे गाणं रोहित श्याम राऊत आणि ‘द व्हॉइस इंडिया’ फेम श्रीनिधी घटाटे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलं आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गीत लिहिलं असून, पंकज पडघन यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. ललित आणि नेहाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हे गाणं गोवा या सुंदर ठिकाणी चित्रित केलं आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि कुलदीप जाधव दिग्दर्शित TTMM (तुझं तू माझं मी) हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.


 

Loading...
SHARE