‘फक्त मराठी’ वर थरारपटांची मेजवानी

Tharaar On Fakt Marathi

‘फक्त मराठी’ वर थरारपटांची मेजवानी

‘फक्त मराठी’ वाहिनीने अल्पावधीत रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांची पसंती लक्षात घेत फक्त मराठी वाहिनी नेहमीच वैविध्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवित असते. याच धर्तीवर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघण्याची संधी ‘फक्त मराठी’ वाहिनीने रसिकांसाठी आणली आहे. फेब्रुवारी महिन्यात दर शुक्रवारी रात्री ८:३० वा. वैविध्यपूर्ण थरारपटांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे.

‘थरार’ चित्रपटांच्या मेजवानीत ३ फेब्रुवारीला ‘द शॅडो’, १० फेब्रुवारीला ‘७०२ दीक्षित’, १७ फेब्रुवारीला ‘काळशेकर आहेत का?’ आणि २४ फेब्रुवारीला ‘लोणावळा बायपास’ सारखे थरारपट रात्री ८:३० वा. ‘फक्त मराठी’ वाहिनीवर पहाता येणार आहेत.


 

Loading...
SHARE