ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयीची ‘बेभान’ जोडी

Thakur Anoopsingh and Mrunmayee Deshpande In Upcoming Bebhan Marathi Movie

ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयीची ‘बेभान’ जोडी

ठाकुर अनूपसिंग हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. मिस्टर वर्ल्ड विजेता ठाकुर अनूपसिंग आपल्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या पर्दापणास सज्ज झाला आहे. अनूप अशोक जगदाळे दिग्दर्शित आगामी ‘बेभान’ या सिनेमात ठाकुर अनूपसिंगचा मराठमोळा अंदाज पाहता येणार आहे. सिंघम -3 या तेलगू तर कमांडो 2 या हिंदी अशा आगामी सिनेमांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे.   दिग्दर्शक अनूप अशोक जगदाळे यांच्या ‘बोभाटा’ या सिनेमाची चर्चा सिनेवर्तुळात जोरदार चालू आहे. मधूकर (अण्णा) उद्धव देशपांडे हे निर्माते असून सह निर्माते प्रसाद देशपांडे आहेत. दिनेश देशपांडे यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.

 

शांभवी फिल्मस या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या वर्षात प्रदर्शित होणा-या या सिनेमात आपल्याला ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडे यांची हटके जोडी पाहता येणार आहे. या दोघांसोबतचं स्मिता जयकर व संजय खापरे यांच्याही अभिनयाचा आस्वाद घेता येणार आहे.

ए.वि प्रफुल्लचंद्र यांनी या सिनेमाला सुमधूर संगीत दिले असून मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. अनूप-अनूप अशा जोडगोळीचा रोमान्स विथ अॅक्शन असलेला सिनेमा 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 

Loading...
SHARE