तेजस्विनीचा नवीन टॅटू

तेजस्विनीचा नवीन टॅटू

सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीज पर्यन्त सर्वांना टॅटूचे क्रेझ आहे. नव-नवीन डिझाइन्स किंवा नाव लिहिलेला टॅटू करण्याचा जणू काही ट्रेंडच सध्या सुरु झालेला आहे. नुकतेच गुलाबाची कळी तेजस्विनी पंडितने देखील आणखी एक नवीन टॅटू काढला आहे. टॅटू हि अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती सोबत आयुष्यभर राहते आणि फक्त हौस म्हणून नाही तर तो टॅटू काढण्यामागे काही तरी अर्थ असला पाहिजे अशा मताच्या तेजस्विनीने हॅन्ड् ऑफ फातिमा हा टॅटू काढला आहे. हॅन्ड् ऑफ फातिमा म्हणजे पॉसिटीव्हिटी, अबंडंस आणि विश्वास. स्त्री शक्तीच प्रतीक म्हणून हॅन्ड्स ऑफ फातिमा ओळखलं जातं. हा आगळा वेगळा टॅटू तेजस्विनीवर खूप उठून दिसतो आहे आणि तेजस्विनी तिच्या या नवीन टॅटू बद्दल खूपच जास्त उत्सुक आहे.

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE