सुयश इज गोइंग ग्रीन

Suyash Tilak

सुयश इज गोइंग ग्रीन

 जागतिक पर्यावरण दिन म्हणून प्रत्येक जण हा एक दिवस आपल्याला पर्यावरणासाठी काय काय करता येईल याचा विचार करत असतो, पण आपल्या सर्वांचा लाडका आणि आवडता अभिनेता सुयश टिळक याने फक्त विचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणासाठी आपली आत्मीयता व्यक्त केली आहे. सुयश हा एनवायरोमेंटलिस्ट असून त्याने गेल्या वर्षी पर्यावरण दिवशी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला होता आणि नुसता संकल्पच नाही तर त्याच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून त्याने आता पर्यंत ४० ते ४५ झाडे लावली आहेत आणि पुढील वर्षी पर्यंत याही पेक्षा जास्त झाडे लावण्याचा संकल्प सुयशने या जागतिक पर्यावरण दिवशी केला आहे.  जागतिक पर्यावरण दिवसासाठी आपल्या चाहत्यांना एक संदेश देताना सुयश म्हणाला, “सध्याची भीषण परिस्थिती पाहता आपल्याला पर्यावरणासाठी एक पाउल पुढे टाकणे गरजेचे आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे वाढणारे तापमान, दुष्काळ, पाउस कमी पडणे यांसारख्या समस्यांना आपण तोंड देत आहेत. यासाठी आपण एकमेकांना दोष देत बसण्यापेक्षा आपणच सुरुवात करून शक्य तितकी झाडे लावली आणि त्यांची योग्य काळजी घेतली तर भविष्यात ते आपल्यासाठीच फायदेशीर ठरेल आणि आपण लावलेल्या झाडांना मोठे होताना तसच त्यांना फळ-फुले येताना बघण्यात जो आनंद असतो तो खूप मोठा आनंद असतो, म्हणून फक्त बोलून नाही तरी कृती करून आपण हा जागतिक दिवस साजरा करूया आणि पर्यावरण वाचवूया.”

जागतिक पर्यावरण दिवशी सुयशने स्वतः लावलेल्या झाडांचे काही फोटोज तसेच त्याच्या लहानपणी लावलेल्या झाडासोबतचा फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.आपण सर्वांनीच सुयश प्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाउल पुढे टाकले पाहिजे.


 

Loading...
SHARE