महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन अंकुश आता करणार फॅशन ब्रँड एनडॉर्स

ankush chaudhari stye icon hashtag

महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन अंकुश आता करणार फॅशन ब्रँड एनडॉर्स

मोठ्या पडद्यावरील त्याच्या प्रेजेंस आणि स्टाईलने सर्व प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप पडणारा महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने नेहमीच मराठी चित्रपट सृष्टीत बेंचमार्क सेट केला आहे. उत्कृष्ट फॅशन सेन्स असलेल्या आणि तीन वेळा महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉनचा पुरस्कार पटकावून हॅट्रिक करणाऱ्या अंकुशच्या जबरदस्त स्टाईलला यंगस्टर्सनि नेहमीच उचलून धरले. अंकुशच्या चाहत्यांसाठी आता पर्वणी असणार आहे कारण हास्टाईल आयकॉन आता एक मेन्स क्लोथिंग ब्रँड एनडॉर्स करणार आहे.

हॅशटॅग नावाच्या मेन्स फॅशन ब्रँडने अंकुश चौधरी या स्टायलिश अभिनेत्याची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. द हाउस ऑफ कॉरनियाचे सब-ब्रँड असलेलाहॅशटॅग हा ब्रँड तरुणांसाठी फॉरमल, कॅज्युअल, पार्टी आणि एथनिक वेअर मध्ये विविध पर्याय प्रदान करणार आहे. अंकुशची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता व क्रेझ आणिब्रँडला मॅच होणारी त्याची स्टाईल आणि पर्सनॅलिटी यामुळे फॅशन ब्रँडला प्रमोट करण्यासाठी अंकुश हि अगदी योग्य निवड आहे हे म्हणणे खोटे ठरणार नाही.नुकतेच पुण्यामध्ये स्टाईल आयकॉन अंकुशच्या उपस्थितीत हॅशटॅग स्टोर लाँचचा सोहळा पार पडला.

मोठ्या पडद्यावरआपल्या प्रत्येक कॅरेक्टर मधून स्टाईल आणि फॅशन ट्रेंड सेट करणारा अंकुश आता फास्ट मूविंग ट्रेंड्सआणिन्यू स्टाईलकडे कल असलेल्या तरुणाईचा फॅशन पोलिस या भूमिकेत दिसून येईल.

Read This Article In English —-> Click Here


Loading...
SHARE