गोष्ट “तिच्या” चुंबनाची !

गोष्ट “तिच्या” चुंबनाची !
सिनेमा आणि अभिनेत्री यातली एक कॉमन गोष्ट म्हणजे सिनेमाच्या पडद्यामागील अभिनेत्रीच्या खाजगी गोष्टी. ज्याला आजकाल गॉसिप असे देखील म्हटले जाते. अशीच एका किसिंगची चर्चा सध्या मराठी सिनेवर्तुळात होते आहे. सचिन दरेकर लिखित आणि दिग्दर्शित “पार्टी” या मराठी सिनेमात काम करणारी अभिनेत्री मंजिरी पुपाला या अभिनेत्रीचा एक मजेशीर किस्सा सिनेमाच्या सेटवर घडला.

मंजिरी सांगते कि, पार्टी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. नेहमीप्रमाणे मी सेटवर पोहोचली. त्या दिवशी एक गाणं चित्रित होणार होतं म्हणून मी तयारी करून बसली. तेवढ्यात सिनेमातील कलाकार सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे आणि रोहित हळदीकरमाझ्या जवळ आले आणि मला म्हणाले कि, तू रेडी आहेस ना ? भिऊ नकोस…असं काहीबाही बोलू लागले. काही क्षण मला कळेचना की हे सर्व असे काय बोलताय. मग त्यांनीच सांगितले कि या गाण्यात तुला एक किसिंग सीन द्यायचा आहे. हे ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा असं काही नव्हतं. म्हणून मग मी दिग्दर्शक सचिन दरेकर यांचेकडे गेली. त्यांनी सुद्धा सांगितले की, अचानक स्क्रिप्टमध्ये बदल करावा लागला. पण तू तुझा वेळ घे, रेडी झाली कि मला सांग.

दिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने मी खूपच हादरून गेली होती. भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते कि स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. आता मला तर सेटवरच रडू कोसळलं. जरा वेळ मला रडतांना पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. मी पुन्हा संभ्रमित झाली. काही कळण्याच्या आतच दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी सांगितले कि आज आम्ही सगळ्यांनी तुझी फिरकी घायचे ठरवले होते. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि गाण्याचं शुटींग पार पडलं. ‘पार्टी’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. अमितराज यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे.

Loading...
SHARE