पटलं तरच घ्या…नाहीतर सोडू द्या..!

‘सोशल मीडिया’ समाज प्रबोधनाचे साधन झाला आहे. तसाच तो लोकांच्या विरंगुळ्याचेही साधन आहे. आजकाल अनेकजण प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ऑनलाईनच भेटत आसतात. जून्या आठवणी नव्याने शेअर करत असतात.(ऑनलाईन) थोडक्यात काय इंटरनेट मोबाईलवर सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लोकांच्या आनंदाला पारावार नाही. त्यात व्हॉट्स अॅ्प, फेसबूकने तर क्रांतीच केली आहे. जुन्या काळी गावात पार किंवा कट्टा असायचा. या पारावर गावातल्या भानगडी, बऱ्यावाईट गोष्टींची चर्चा व्हायची. त्याची जागा आता व्हॉट्स अॅनप, फेसबूकने घेतली आहे.
आता या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच होतात. मित्रांशी भांडण, टिंगल-टवाळी, हास्य-विनोद, सुख-दुख:ची देवाणघेवाण हेही ऑनलाईन. काळ बदलला लोकही बदलले लोकांची संवादाची, व्यवहाराची साधनेही बदलली. पुर्वी लोक शब्दातून बोलायचे. स्मार्टफोन घराघरात पोहोचल्यापासून लोक चित्रात बोलतात. फोटो काढतात…त्यातून कधी विनोदाची निर्मीती होते. तर कधी उपहास. कधी कधी वास्तव स्थीतीवर ईतके छान भाष्य होते. की प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नाहीत. आता पूढील काही ईमेजेसच पहा ना… ज्या सोशल मीडियात भलत्याच व्हायरल होत आहेत….
सोशल मिडीयामुळे क्रियेटीव्हीटी ही कोणाची मक्तेदारी राहीली नाही. क्रियेटीव्हिटीला संपूर्ण जगाचे व्यसपीठ इंटरनेटने उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या जोरावर कोणीही एका रात्रीत स्टार बनू शकतो ही इंटरनेटची ताकद आहे. कोणतीही घटना, समस्या असो किंवा एखादा आनंदाचा क्षण लोक एका क्लिकमध्ये तो जगापर्यंत पोहोचवू लागले आहेत. अनेकांचे व्हॉट्स अॅ्प, फेसबूक ईमेलचे इनबॉक्स अशा संदेशांनी भरून जाऊ लागले आहेत.
निवडणुका, राजकीय पक्ष, राजकीय नेते, समाजातली विसंगीत ही तर सोशल मीडियाचे खास खाद्य. जगात अशी एकही गोष्ट नाही की, ज्याच्यावर सोशल मीडिया भाष्य करत नाही. जगातल्या प्रत्येक घटना घडामोडीवर सोशल मीडियाची बारीक नजर आसते. ती एक मोठी ताकद बणू पाहात आहे. ज्या ताकदीला रोखून धरण आजच्या व्यवस्थेला अशक्य कोटीतील बाब बणत चालली आहे. हेच सोशल मिडीयाच्या लोकप्रियतेचे खरे कारण आहे.