नवोदित रसिकाच्या लावणीचा जबरजस्त ठसका

Rasika Sunil Lavani Poshter girl

नवोदित रसिकाच्या लावणीचा जबरजस्त ठसका

ढोलकीच्या ठेक्यावर ताल धरून केलेली लावणी म्हणजे रसिक प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन. प्रेक्षकांची आवड लक्षात घेता महाराष्ट्राच गाजलेलं लोकनृत्य लावणी हि अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. चटकदार लावणीने चित्रपटाला येणारी रंगत हि काही वेगळीच असते. अप्सरा आली म्हणत सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपट पोष्टर गर्ल मध्ये देखील अशीच एक फक्कड लावणी आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या ‘कशाला लावतोस नाट’ या लावणीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. पण या लावणीतील लावण्यवती सोनाली नसून एक नवखा चेहेरा आहे. तिच्यादिलखेचक अदा, किलर लुक्स आणि लचकदार ठुमाक्यानी सर्वांना घायाळ करणारी हि लावण्यवती म्हणजे रसिका सुनील. बेला शेंडेचा अप्रतिम आवाज आणि लावणी नृत्य दिग्दर्शनात हातखंडा असलेल्या फुलवा खामकर नेनृत्यबद्ध केलेल्या या लावणी मध्ये रसिकाने तिच्या मोहक नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

Rasika Sunil Lavani Poshter girl

समीर पाटील दिग्दर्शित पोष्टर गर्ल मधील रसिकाचीहि लावणी कमी वेळातच जबरदस्त लोकप्रिय होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील हा नवा चेहरा प्रोमिसिंग आहे. रसिकाची मराठी चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवातच इतकी धमाकेदार झाली आहे कि प्रेक्षक तिला यापुढे देखील मोठ्या पडद्यावर पाहायला पसंत करतील. रसिकाने या चटकदार लावणीतून सर्वानाच क्लीन बोल्ड केले आहे यात शंकाच नाही.

Read this Article in English —> Click Here


 

Loading...
SHARE