टीव्हीची सगळ्यात छोटी कृष्ण, आता ओळखता सुद्धा येत नाही..

https://i9.dainikbhaskar.com/thumbnails/680x588/web2images/www.bhaskar.com/2017/08/14/dharti-bhatia_150269.jpg

टीव्हीची सगळ्यात छोटी कृष्ण, आता ओळखता सुद्धा येत नाही..
आजवर टिव्हीवर अनेक बालकलाकारांनी कामं केली, मात्र त्यातल्या काहींनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या कलाकारांनी फक्त आपल्या अभिनयानेच नाही, तर आपल्या गोड दिसण्यानेसुद्धा प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. तुम्हाला ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतील ‘पिहू’ तर आठवत असेलच, याच पिहूने आपल्या गोड अभिनयाने आणि गोड दिसण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आणखीन एक मुलगी अशीच होती, ज्या मुलीने आपल्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातलेली. कलर्स वाहिनीवरील ‘ जय श्रीकृष्ण’ या मालिकेत एक छोटीशी मुलगी श्रीकृष्णाचा उत्कृष्ट अभिनय करायची. त्या मुलीला बघून असं वाटायचं की हेच लहानपणीचे भगवान श्रीकृष्ण आहेत. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आज आपण त्याच मुलीबद्दल बोलणार आहोत, ज्या मुलीने या मालिकेत श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकाराचं नाव आहे धृति भाटिया.. या मालिकेनंतर धृति टीव्हीवर फारशी दिसली नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला तिचे काही लेटेस्ट फोटो दाखवणार आहोत. ज्यात ती खूप गोड आणि सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो बघून तुम्ही सुद्धा तिचे फॅन व्हाल. ‘जय श्रीकृष्ण’ या मालिकेशिवाय धृती काही सिरियल्समध्ये सुद्धा दिसली होती. मात्र श्रीकृष्ण मालिकेत तिला जेव्हढं प्रेम मिळालं तेव्हढं इतर मालिकांमधून मिळालं नाही. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘माता की चौकी’ या सिरियल्समध्ये देखील ती दिसली होती. त्यानंतर काही जाहिरातीत सुद्धा ती झळकली होती. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, ‘जय श्रीकृष्ण’ मालिकेतील आपली भूमिका आणि ती मालिका मी कधीही विसरू शकत नाही.

https://i9.dainikbhaskar.com/thumbnails/680×588/web2images/www.bhaskar.com/2017/08/14/dharti-bhatia_150269.jpg

तिने ते भगवान श्रीकृष्ण बनण्याचे दिवस आठवले, देव बनल्यानंतर लोक कसे रिस्पेक्ट करायचे असं ती म्हणाली. ऑफ स्क्रीन असो किंवा ऑन स्क्रीन लोक तिला बाळ गोपाळचा अवतार मानायचे. युनिटमधील सगळे लोक तिला कन्हैया नावाने हाक मारायचे, आणि या अशा मजेशीर वातावरणात ती आपलं शूटिंग पूर्ण करत असे. एवढ्या वर्षात धृती मोठी झाली आहे, आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे लागली आहे. आपल्या अभ्यासासोबत काम यांचा बॅलेन्स ती योग्यरितीने सांभाळते. धृतीचे आताचे फोटो बघून आपण तिला ओळखुच शकणार नाही. एव्हढ्या वर्षानंतर देखील ती तेवढीच सुंदर आणि गोड दिसते. तुम्हीच बघा तिचे काही फोटो. हम्म.. काय बघताय तुम्ही ? तिला गाण्यांची खूप आवड आहे वाटतंय, मोठं झाल्यावर मोठं काम करेल आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा..

Loading...
SHARE