झी टॅाकीजवर ‘मर्डर मेस्त्री’

झी टॅाकीजवरमर्डर मेस्त्री’

प्रत्येकाच्या जगण्याच्या वेगवेगळ्या तर्‍हा असतात. कोकणातल्या मेस्त्री कुटुंबातील अशाच तर्‍हेवाईक मंडळीची कथा, दिग्दर्शक राहुल जाधव यांनी मर्डर मेस्त्री   सिनेमातून मांडली. या विचित्र तर्‍हांमुळे मेस्त्री कुटुंबात उडणाऱ्या गोंधळाची धमाल दाखवणारा ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमाचा आस्वाद रविवार २६ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. प्रेक्षकांना झी टॅाकीजवर घेता येणार आहे.

दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते हृषिकेश जोशी, क्रांती रेडकर, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत,  मानसी नाईक या मात्तबर कलाकरांच्या अभिनयाने नटलेला ‘मर्डर मेस्त्री’ झी टॅाकीजच्या प्रेक्षकांसाठी एक मजेशीर अनुभव असणार आहे. रहस्य लपवण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या गमती-जमतींना विनोदाची जबरदस्त फोडणी देत निर्माण होणारी गूढता हे ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाचे वेगळेपण आहे.

प्रसारण –  ‘मर्डर मेस्त्री’ झी टॅाकीजवर २६ जूनला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा.


 

Loading...
SHARE