‘चार्ली’ चा मुहूर्त

muhurat-of-charlie-marathi-movie

‘चार्ली’ चा मुहूर्त

मराठी रुपेरी पडद्यावर मनोरंजक चित्रपटांची मोठी परंपरा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात रसिकांचे मनोरंजन करणारा चार्ली इज बॅक हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच लालबागच्या राजाच्या चरणी या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन प्रकाश भालेकर याचं आहे.

चार्ली चॅप्लिन यांनी जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला हसवलं पण त्याचबरोबर रडवलंही. चार्ली आर्ट्स अँड फिल्म्स प्रस्तुत चार्ली इज बॅक हा सिनेमाही दिलखुलास मनोरंजन करत प्रेक्षकांना निखळ आनंद देईल असा विश्वास चित्रपटातील निर्माता- दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला.

रमेश भाटकर, अशोक शिंदे, सुशांत शेलार, पूजा सावंत, सारा श्रवण, रुपेश पालव व ज्युनिअर चार्ली यांच्या भूमिका चार्ली इज बॅक सिनेमात आहेत. या चित्रपटाचे निर्माते संतुकराव कोलते, विनोद वैष्णव, सोमनाथ स्वभावणे असून कार्यकारी निर्माते राजेश कुलकर्णी, महेश लाटणे आहेत.

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE