जगण्याला नवी दिशा देणारी ‘लालबागची राणी’

New Direction To Life - Lalbaughchi Rani Coming Soon

जगण्याला नवी दिशा देणारी ‘लालबागची राणी’

‘टपाल’ या सिनेमातून आपले  दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी ‘लालबागची राणी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम करणा-या वीणा जामकरची यात मध्यवर्ती मुख्य भूमिका असून, जगण्याला नवी दिशा देणा-या ‘लालबागची राणी’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. आपल्या कुटुंबापासून हरवलेल्या एका असाधारण मुलीचा मनोरंजक प्रवास यात ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. यापूर्वी ‘लालबाग परळ’, ‘टपाल’, ‘कुटुंब’ ‘बायोस्कोप’ या सिनेमातून आपल्या अभिनयाचं वेगळपण नेहमीचं जपणाऱ्या वीणाचा लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये दिसून येतोय. या सिनेमात वीणा ‘संध्या नितीन परुळेकर’ या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीची भूमिका साकारते आहे. लालबागमध्ये राहणारी संध्या सगळ्यांचीच लाडकी असल्यामुळे तीला सर्वांनी  ‘लालबागची राणी’ हे नाव दिले. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विणाने उत्कृष्ट अभिनयाची घट्ट विण बांधलेली दिसत असून तिच्या अभिनय कारकिर्दीसाठी हा चित्रपट महत्वाचा ठरेल यात शंका नाही.

गेली १६ वर्ष हिंदी सिनेसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत असणा-या लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन देखील वाखाण्याजोगेच आहे. ‘लालबागची राणी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमाच्या सहनिर्मितीतही भाग घेतला आहे. ‘माझ्या अवतीभोवती घडलेल्या आणि मी अनुभवलेल्या अशा काही घटना या चित्रपटात असून, हा सिनेमा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले.  तर वीणाने या चित्रपटातील ‘संध्याची प्रमुख व्यक्तिरेखा दिल्याबद्दल दिग्दर्शकांचे आभार मानले.  ‘लालबागची राणी’ मधून मी वेगळ्या रुपात लोकांसमोर येणार असून, या रुपात प्रेक्षक मला पसंत करतील अशी अशा बाळगते’ असे विणाने सांगितले.   रोहन घुगे यांनी या सिनेमाची कथा,पटकथा तसेच संवाद लिहिले असून रोहित नागभिडे यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. अंजुषा चौगुले, स्वरांजली भरडे, लक्ष्मण उतेकर आणि वैभव देशमुख यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणाऱ्या या सिनेमाचे संकलन देवराव जाधव यांनी केले आहे. दिव्या कुमार, कीर्ती सागठिया, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा या गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने सिनेमातल्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. मॅड एंटरटेनमेंट या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे, तर बोनी कपूर हे सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत.या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमाचे साउंड डिझायनर निहार राजन समल तसेच कोरिओग्राफर अमित बाईंग हे दोघेही हिंदी सिनेसृष्टीतले असून निहार समल यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे.  लालबागच्या राणीसोबतच म्हणजेच वीणासोबत या सिनेमात अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे या कलाकारांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाकार, तंत्रज्ञ, गायक, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्या बाजूने उत्तम असलेला हा सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read This Article In English —> Click Here


Loading...
SHARE