…हा भारतीय करतोय जगातली सर्वश्रेष्ठ दान !!

गोरगरीबांना मदत करणारे अनेक मसिहा आपल्या आजुबाजूला असतात. पण एक असाही अवलिया आहे जो केवळ दहा रुपयात पोटभर जेवण देतो. तामिळनाडूमधील मदुराई शहरात 70 वर्षाचे रामू काका राहतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून भुकेलेल्या, गोरगरीब जनांना केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण देतात.
लाखो, करोडोचे घोटाळे ज्या ठिकाणी उघडकीस येतात तिथे 10 रुपयांती किंमत ती काय? मुंबई सारख्या ठिकाणी फार फार तर एखादा वडापाव या किंमतीत मिळेल. सध्याच्या जमान्यात दहा रुपयाची किंमत ती काय? पण जेव्हा तुम्ही तामिळनाडूतच्या मदुराईत शहरात भुकेलेले असाल आणि हातात केवळ दहा रुपये असतील तर याच खुप मोठ महत्त्व तुम्हाला कळेल. कारण केवळ दहा रुपयात पोटभर अन्न इथे तुम्हाला मिळणार आहे. शहरातील अण्णा बस स्टँडजवळ रामू यांचं हॉटेल आहे. त्यांच्या या भल्या स्वभावाचं लोकांकडूनदेखील कौतुक होत असून त्यांचा आदर करतात. लोक त्यांना प्रेमाने ‘रामू ताता’ म्हणून हाक मारतात. रामू 14 वर्षांचे असताना आपल्या घरातून पळून आले होते. तेव्हापासून ते मदुराई येथेच राहतात.
गरीबीचे दिवस पाहिलेल्या अनेकांना त्यांच्या त्या हालाखीच्या दिवसाची आठवण राहते. मग ते त्यांच्या चांगल्या दिवसात गोरगरींबांना मदत करीत असतात. मदुराई येथील एका मठमध्ये तेथील गरिब लोक ज्यांच्याकडे एकावेळच्या अन्नासाठीही पैसे नाहीत ते जेवण्यासाठी येत असत. या भुकेलेल्यांसाठी काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्याच दरम्यान 1967 मध्ये रामू आणि त्यांच्या पत्नीने एक दुकान भाड्याने घेतले. रामू यांनी तिथे हॉटेलचा व्यवसाय सुरु केली. त्यावेळी रामू यांनी हॉटेलमध्ये इडली, डोसा सारखे पदार्थ ठेवले होते. यापैकी कोणताही पदार्थ घेतल्यास ते फक्त 10 रुपये घेत असत. 10 रुपयांत तीन इडल्या मिळत असल्याने लोकांचीही चांगली गर्दी होत होती. दर्जेदार जेवणामुळे रामू यांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत होती. मग रामू यांनी ब्रेकफास्ट देण्यावर सिमीत न राहता जेवणही ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण विशेष म्हणजे जेवणासाठीही फक्त 10 रुपये आकारले जातात. त्यांच्या हॉटेलमध्ये रोज जवळपास 300 लोक जेवण्यासाठी येतात. जर एखाद्या दिवशी अन्न संपलं तर ग्राहकांना पैसे देऊन दुस-या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यास ते सांगतात. आताच्या जगात अस करणारा कोणता हॉटेल मालक शोधून तरी सापडणार आहे का? हा मोठा प्रश्न आहे.
इतकंच नाही तर रामू आपल्या कमाईतील काही भाग हॉटेलमध्ये काम करणा-या कामगारांसोबत शेअर करतात. सोबतच त्यांना कामाचा मोबदलाही देतात. पण इतक्या कमी दरात जेवण देत असल्याने त्यांची इतकी चांगली कमाई होत नाही. पण जितकी कमाई होते, त्यातील काही भाग ते आपल्या कामगारांसोबत न चुकता शेअर करतात.
पत्नीला दिले होते वचन
2005 साली रामू यांच्यावर खुप मोठा दु:खद प्रसंग ओढावला. प्रत्येक सुखदु:खात त्यांच्यासोबत असणाऱ्या पत्नीचं निधन झालं.

Man with his hands up watching the sun set

रामू आणि त्यांच्या पत्नीने समाजसेवेचा वसा हाती घेतला होता. त्यामध्ये आता खंड पडतो का असे वाटत होते. पण त्याचवेळी स्वत:ला सावरुन रामू यांनी मोठा निर्णय घेतला. मृत्यूपुर्वी त्यांनी सामान्य आणि गरिब माणसांची सेवा करण्याचं वचन घेतलं होतं. आपल्या पत्नीला मृत्यूपुर्वी दिलेलं हे वचन पुर्ण करण्याचे त्यांनी ठआम केले. त्यानुसार रामू फक्त 10 रुपयांत जेवणाची सोय करत आहेत. यासाठी रामू यांना देणगी देणाऱ्या अनेक मदतीच्या हातांची गरज असते. काही स्वत:हून पुढे येत असतात.