तेजस्विनीने पटकावले सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ४ पुरस्कार

Tejaswini Pandit Ticha Umbartha

तेजस्विनीने पटकावले सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ४ पुरस्कार

चित्रपट प्रदर्शित होण्या आधीचनामांकित पुरस्कार सोहळ्यात विविध विभागात पुरस्काराने गौरवण्यात आलेला चित्रपट म्हणून चर्चेत असलेला ‘तिचा उंबरठा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.बॉलीवूड मधील नामांकित अॅक्शन डिरेक्टर रवि दिवाण निर्मित ‘तिचा उंबरठा’ मध्ये तेजस्विनी पंडित आणि चिन्मय मांडलेकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून चित्रपटाची नायिका तेजस्विनीने देखील या उत्कृष्ट अभिनेत्रीचे चक्क ४ पुरस्कार पटकावले आहेत.

तिचा उंबरठा या चित्रपटाचे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स मध्ये देखील कौतुक झाले. उत्तम विषय असलेल्या या चित्रपटाचे कथानक  जयंत पवार यांनी लिहिलेल्या माझ घर या मराठी नाटकावर आधारित आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या तेजस्विनीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने झी गौरव, संस्कृती कलादर्पण, सांगली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि चित्रपुष्प मराठी फिल्म फेस्टिवल या सारखे नामांकित पुरस्कार पटकावले आहेत.प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत असा तिचा उंबरठा हा चित्रपट २६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून तेजस्विनी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.


 

Loading...
SHARE