‘रईस’च्या छोट्या शाहरूखचं ‘हाफ तिकीट’

Child Shahrukh of 'Rais' Doing Half Ticket

रईसच्या छोट्या शाहरूखचं हाफ तिकीट’ 

बॉलीवूडच्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकार पहात असतो. त्यातही तो बडा स्टार शाहरूख खान असेल तर ‘सोने पे सुहागाच’. किंग खान सोबत काम करण्याची ही नामी संधी शुभम मोरे या मराठी बालकलाकाराला मिळाली आहे. शुभम मोरे शाहरूखच्या ‘मोस्ट अवेटेड रईस या चित्रपटात शाहरूखच्या लहानपणीची भूमिका साकारणार आहे.

 आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल बोलताना शुभम सांगतो की, रईस मधील शाहरूख खान यांच्या लहानपणीच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. माझ्यासाठी बॉलीवूडच्या बादशाहसोबत काम करण्याची ही सुवर्णसंधीच होती. रईसचं शूटिंग मी एन्जॉय केलं. माझ्या भूमिकेचं शाहरुखने केलेलं कौतुक माझ्यासाठी अनमोल होतं. शाहरुख खान एके दिवशी सेटवर मला भेटायलादेखील आले होते.  त्यावेळी आम्ही एकत्र फोटोज काढले. रईस सिनेमातील शुभमचा ‘हाफ तिकीट हा मराठी चित्रपट ही सध्या चर्चेत आहे. व्हिडीओ पॅलेस निर्मित समित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट’ २२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE