सोशल मिडीयावर व्हायरल गेलेल्या ‘भावड्या’ ला भेटा ३ ऑगस्ट ला!

bhavdya-is-coming-on-3-august

३ ऑगस्ट ला येतोय भावड्या! सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे! कोण आहे हा भावड्या? सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय हा, त्याच्या येण्याचे अनेक टीझ वायरल होत आहेत. सगळयांनाच त्याच्या येण्याची उत्सुकता लागून राहिली आहे, पण काहीच कळत नाही आहे.

bhavdya 1

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक अशा पोस्ट सोशल मीडियावर share करताना आढळलेले. ३ ऑगस्ट ला खरंतर बहुचर्चित पुष्पक विमान चित्रपट रिलीज होतो आहे…
सुरुवातीला हे त्याच्याशी निगडित काही असेल अशी शंका काहींना आली त्यातूनच भावड्या कडून पुष्पक विमान टीमला शुभेच्छा अशीही पोस्ट आली.(स्क्रिनशॉट फोटो)

bhavdya 4

पण मग “पार्टी” चित्रपटाचे कलाकार-तंत्रज्ञसुद्धा ह्या भावड्याच्या पोस्ट करू लागले. भावड्या असं करेल. भावड्या असा आहे तसा आहे. काल संध्याकाळी पार्टी चित्रपटाच्या official हॅन्डल वरून रवी जाधव यांना टॅग करून “भावड्या” गरीब असला म्हणून काय झाले, “भावड्या”च्या मनाची श्रीमती अपरंपार आहे, चला हवा येउ द्या!

bhavdya 3

आणि तेजश्री प्रधान ला टॅग करून ती सध्या काय करते? विचारण्यात आले तर ती “भावड्या” ची वाट बघते आहे, असं म्हणाली! ट्विटर इंस्टाग्राम वर सुद्धा काही सेलिब्रेटी अकाउंट्स आणि जास्त फॉलोवर्स असणारे अशा अनेक “भावड्या” पोस्ट्स share करताना आढळले.

bhavdya 2

एकंदरीत “भावड्या” ची चर्चा खूप सुरु आहे…आता वाट पहावी लागणार 3 तारखेची… काय असेल कोण असेल भावड्या ते त्याच दिवशी कळेल!


 

Loading...
SHARE