मालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव

मालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव

मालिकांना त्यांच्या शीर्षक गीतामुळे अनेकदा ओळख मिळते. त्यामुळे मालिकांच्या निर्मितीमध्ये शीर्षक गीत हे फार महत्वाचे असते. मालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये अनेक मोठ्या गायकांच्या नावाचा समावेश असून कविता राम या गायिकेचे नाव सामील झाले आहे. झी मराठीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’ या मालिकेसाठी कविता यांनी आपला आवाज दिला आहे. या शीर्षक गीताबरोबरच कविता यांनी ‘बाजी’मधील अजून दोन गाण्यांनासुद्धा आवाज दिला आहे. कविता यांना वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायला आवडत असून त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमांतील गीतांना आवाज दिला आहे. या गाण्याबद्दल कविता यांना विचारले असता त्या म्हणाल्या की,”एका गाण्याच्या संदर्भात ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांच्याकडे गेले असता त्यांना माझा आवाज आवडला. आणि त्यांनी मला ‘बाजी’चे शीर्षक गीत गाण्याची संधी दिली. ‘बाजी’चे शीर्षक गीत गायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी बाब आहे.” अल्पावधीतच ‘बाजी’ मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

 

Loading...
SHARE