आलोक आणि इंदूची फिल्म डेट

Alok and Indu's Film Date

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही. मग ‘मुरांबाचे’ आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर तरी कसे मागे राहतील! नुकताच त्यांनी ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ म्हणत ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबत फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. आणि प्रेक्षकांच्या भेटीला मुरांबा २ जूनला येणार आहे कारण २६ मेला ते सुद्धा ‘सचिन’ बघायला जाणार असल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत.


 

Loading...
SHARE