पु. ल. देशपांडेच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ नावाची मालिका सब TV वर लवकरच…

महाराष्ट्राचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. महाराष्ट्रात stand up कॉमेडी खऱ्या अर्थाने सुरु करणारे पुलंचे विनोद आजही अजरामर आहेत. याच त्यांच्या साहित्यातील ‘व्यक्ती आणि वल्ली’ वर आधारित ‘नमुने’ नावाची एक मालिका सब TV वर सुरु होत आहे. दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेमध्ये ‘हरितात्या’ ही भूमिका साकारत असून प्रसिद्ध अभिनेते संजय मोने साक्षात पुलंची भूमिका साकारणार आहेत.

याच मालिकेच्या निमित्ताने इंटरनेट वरील प्रसिद्ध web channel ‘भारतीय digital पार्टी’ म्हणजेच ‘भाडीपा’, पुलंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘भाडीपा चे नमुने’ नावाचा stand up comedy चा कार्यक्रम घेऊन येत आहे. यामध्ये नव्या दमाचे आणि पुलंचा आदर्श घेतलेले कॉमिक्स मंदार भिडे आणि सुशांत घाडगे यांनी सहभाग नोंदवला.

सुशांत घाडगे यांनी पुलंच्या हरितात्या या व्यक्तिरेखेशी साधर्म्य साधणाऱ्या ‘पेंडसे काका’ या त्यांनी बघितलेल्या व्यक्तिरेखेचे विनोदी वर्णन केले. हा त्यांचा stand up चा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या लिंक वर:

पेंडसे काकांसारखेच मंदार भिडे यांनी पुलंच्याच ‘पेस्तन काका’ या पारशी व्यक्तिरेखेशी साधर्म्य साधणारे ‘रुस्तम काका आणि त्यांचे आयुष्य’ विनोदी पद्धतीने लोकांसमोर मांडले. या रुस्तम काकांवरील stand up कॉमेडीचा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या लिंक वर:

पुलंची अचाट निरीक्षण शक्ती, त्यांनी उभ्या केलेल्या पात्रांमधले बारकावे आणि आजच्या काळात त्यांचा असलेला ताजेपणा हा आजही अबाधित आहे आणि म्हणूनच पु.ल. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहेत.

बहुचर्चित अशा पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’वर आधारित ‘नमुने’ ही मालिका तुम्ही पाहू शकता २१ जुलैपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता सब टीव्हीवर.


 

Loading...
SHARE