जर तुमच्या पायाचा अंगठा असा असेल तर…

प्रत्येकाच्या शरीराचा आकार हा वेगवेगळा असतो. शरीराचा प्रकार वेगळा असतो मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का असं का असतं?. नसेल केला ना? पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही खास गोष्टी सांगणार आहोत. समुद्रशास्त्रावर नजर टाकली जर आपल्याला कळेल की, मनुष्याच्या शरीराचा आकार हा त्याच्या व्यक्तित्वचा आरसा असतो. जर तुम्हाला या शास्त्रासंदर्भात थोडीशीही माहिती असेल तर तुम्ही कुणाचाही स्वभाव, सवय किंवा त्याच्या भविष्यासंदर्भात माहिती मिळवू शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कशाप्रकारे पायांच्या आकारावरुन एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यवहार, भविष्य तसेच त्याच्यासंदर्भात इतरही माहिती मिळवता येईल.
जर पायाच्या अंगठ्यापेक्षा बोटांचा आकार लहान असेल
या लोकांमध्ये आपलं मतं नोंदविण्याची सवय असते. या लोकांना वाटतं की प्रत्येकाने त्यांचा सल्ला किंवा मत मानावं. जर पती आणि पत्नी यांचे दोघांचेही आकार तशेच असतील तर त्या दोघांच्या नात्यात काहीप्रमाणात तणाव निर्माण होतो. कधीकधी हा तणाव इतका वाढतो की त्यांचा घटस्फोटही होतो.अंगठा आणि त्याच्या बाजूचे बोट यांची लांबी समान
जर एखाद्या व्यक्तीच्या पायाचा अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाची उंची एकसारखी असेल तर असे व्यक्ती मेहनती आणि जबाबदार नागरिक असतात. हे लोकं भांडण, वाद-विवाद यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. असे म्हटले जाते की नशीबवान व्यक्तीला असे जोडीदार मिळतात.अंगठ्याच्या जवळील बोट अंगठ्यापेक्षा मोठे असल्यास
ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट हे अंगठ्यापेक्षा मोठे असेल आणि इतर बोटं ही लहान असतात अशा लोकांना लक्षपूर्वक आणि सांभाळून काम करण्याची सवय असते. हे लोक शारीरिकदृष्ट्या कमकूवत असण्याची शक्यता असते. मात्र, त्यांच्याकडे चांगली बुद्धीमत्ता असते.अंगठा लांब असेल तर…
ज्या लोकांच्या पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा लांबीला मोठा असेल असे व्यक्ती प्रत्येक काम हे शांतीपूर्वक करतात. यांच्या कामावर टीका करणा-यांसोबतही ते शांतपणे भाष्य करतात.अंगठ्या जवळील बोट सर्वात मोठे असल्यास
ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट हे इतर बोटांपेक्षा लांब असेल अशा व्यक्तीला प्रत्येकक्षणी कुठलं ना कुठलं काम करण्याची इच्छा असते. आराम करणं या लोकांना आवडत नाही.