राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

upendra-limaye

उपेंद्र लिमये राहणार लालबागमध्ये

पूर्वीपासून कलाकारांच्या मुंबईतल्या निवासाची जागा ठरलेली आहे. अगदी राज कपूर यांच्यापासून ते सलमान खान, रितेश देशमुख या सगळी कलाकार मंडळींचे अलिशान बंगले, फ्लॅट बांद्रा, वर्सोवा, अंधेरी, गोरेगाव याच परिसरात आहेत. त्यामुळे ग्लॅमर इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी धडपडणारे स्ट्रगलर्सही याच भागात राहण्यास पसंती देतात. बरेच मराठी कलाकारही आता या परिसरात राहू लागले आहेत. पुण्याचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमयेनं मात्र राहण्यासाठी लालबागची निवड केली आहे. लवकरच तो नव्या जागेत शिफ्ट होणार आहे. उपेंद्र हा जागाबदल अचानकपणे का करतोय याचा तपशील मिळालेला नाही. त्याबद्दल बोलण्यास तो तयार नाही. मात्र, मराठी सिनेनाट्यसृष्टीतले काही कलाकार उपेंद्रला मदत करत असल्याचं कळतं आहे. एकेकाळी दादरच्या परिसरात आणि लालबागच्या चाळींमध्येच कलाकार राहत होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेचं
छोट्या पडद्यावर पुनरागमन

– साडेआठ वर्षांनी करतोय मालिका

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये लालबागमध्ये रहायला येत असल्याच्या बातमीत तथ्य आहे. कारण, उपेंद्र लिमये छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो साकारत असलेल्या भूमिकेसाठी तो लालबागच्या चाळीत राहणार आहे.

उपेंद्रनं साडेआठ वर्षांपूर्वी ‘या सुखांनो या’ मालिकेमध्ये काम केलं होतं. त्यापूर्वी त्यांनं बऱ्याच मालिका केल्या होत्या. मात्र, ‘जोगवा’ चित्रपटानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांत तो व्यग्र झाला. त्यामुळे त्याला मालिका करता येत नव्हती. आता त्याला स्टार प्रवाहवरील एका मालिकेमुळे त्याला छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेविषयी आणि त्यातील भूमिकेसाठी तो खूप उत्सुक आहे.

‘स्टार प्रवाहवरील एका मालिकेत मी महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सध्याच्या मालिकांमध्ये ही मालिका नक्कीच वेगळी आणि उल्लेखनीय आहे. मालिका आणि भूमिकेबाबतचे तपशील लवकरच स्टार प्रवाहकडून स्पष्ट केले जातील. मात्र, छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे,’ असं उपेंद्रनं सांगितलं.

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE