काळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त, शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग

shiv-and-ajji-to-expose-nisha

काळ्या पैशांमुळे निशा चिंताग्रस्त शिव आणि आजी फोडणार तिचं बिंग

पाचशे आणि हजारांच्या चलनताील नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि सगळीकडे लोकांची एकच तारांबळ उडाली. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांच्या बॅंकाबाहेर भल्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या तर या नोटा अन्य मार्गाने कशा चालवता येऊ शकतील याचाही प्रयत्न अनेकांनी केला. असे हे प्रयत्न सध्याही सुरु आहेत. बेकायदेशीर मालमत्ता आणि काळा पैसा उघड होणार असल्याने अनेकजण चिंताग्रस्तही बनले आहेत. अशाच काहीशा चिंतेत अडकली आहे ती झी मराठीवरील काहे दिया परदेस मालिकेमधील निशा आणि तिची आई. गौरीच्या लग्नासाठी शिवच्या अम्माने घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी आणि गौरीचं लग्न थाटामाटात लावून देण्यासाठी मधुसुदन सावंतांनी कर्ज काढलं होतं. त्यांच्या या हतबल परिस्थितीचा गैरफायदा घेऊन निशांनी पैशांच्या लालसेपायी सावंतांचं घर अप्पांना विकलं. आपल्या सुनेच्या या कारस्थानाने सावंत कुटुंबियांना धक्का बसला असला तरी निशाचा नवरा नचिकेतने मात्र निशाची बाजू घेत ती निर्दोष असल्याचा निर्वाळाही देऊन टाकला. दुसरीकडे निशाने अप्पांकडून घेतलेले ७० लाख रुपये आपल्या आईच्या घरात लपवून ठेवले. त्या पैशातून आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा स्वार्थी हेतू निशाच्या मनात होता परंतु आता नोटाबंदीच्या निर्णयामुळे तिची आणि तिच्या आईची चांगलीच पंचाईत झाली आहे. ही रक्कम उघड करावी तर आपलं बिंग फुटेल याची भिती निशाच्या मनात आहे त्यामुळेच या ‘ब्लॅक मनी’ ला ‘व्हाईट’ करण्याच्या प्रयत्नात ती आहे. यासाठी वेश बदलून ती बाजारातसुद्धा फिरत आहे आणि या पाचशे आणि हजारांच्या नोटा कुठे चालवता येतील यासाठी ती आणि तिची आई प्रयत्न करत आहेत. शिव आणि आजीला निशाचं हे कारस्थान कळल्यामुळे वेणूला सोबतीला घेऊन ते आता निशाचा हा खरा चेहरा नचिकेतसमोर कसा आणता येईल याच्या विचारात आहेत. यासाठी आता शिव एक नामी शक्कल लढवून निशाला आपल्या जाळ्यात अडकवणार आहे ज्यामुळे तिचं हे काळ्या पैशाचं बिंग फुटणार आहे. निशाचे हे नोट बदलण्याचे प्रयत्न आणि शीवची व्युव्हरचना काहे दिया परदेसच्या येत्या काही भागांमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे सोबतच ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यासाठी एक विशेष संदेशही या भागांमधून दिला जाणार आहे.

 निशाची लाखाची गोष्ट झाली होती व्हायरल

निर्णयानंतर त्याचा कुणावर काय काय परिणाम होईल या आशयाचे अनेक विनोद सोशल नेटवर्क आणि व्हाट्सअॅपवर व्हायरल झाले होते. यामध्ये निशाकडे असलेल्या ७० लाखांवरुनही अनेक विनोद वाचायला मिळत होते. पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आली आता निशाने उशीत लपवलेल्या सत्तर लाखांचं काय होणार असे प्रश्नही अनेकांना पडले होते. आता या सा-या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळतील. यासाठी बघायला विसरु नका काहे दिया परदेस सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. फक्त झी मराठीवर.

Read This Article In English —> Click Here


Loading...
SHARE