कैकालीत पुन्हा एकदा पडणार सरस्वतीचं पाउल … सरू आणि राघवची होईल का भेट?

सरस्वती मालिकेमध्ये सरस्वती परतली असून यामुळे मालिकेला लवकरच वेगळे वळण मिळणार आहे. सरस्वती आता एका नव्या कुटुंबासोबत रहात आहे. याच कुटुंबामध्ये असलेल्या देवाशीष सोबत लग्न करण्यास सरस्वतीने होकार दिला आहे. सरस्वतीच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ती करते आहे. तिला स्वप्नामध्ये तिच्या भुताकाळाच्या काही आठवणी, जागा, दिसत आहेत आणि ती त्याचा शोधण्याचा प्रयत्न करते आहे. देवाशिषचे सरस्वतीवर प्रेम नसून ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत. हे लग्न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे चीनुला तिची सरस्वतीच्या रुपात तिची आई परत मिळेल. पण, येत्या भागांमध्ये मालिकेमध्ये प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळणार आहे. कारण, राघवची सरू म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी सरस्वती कैकालीमध्ये परतणार आहे. सरस्वती कैकाली मध्ये आल्यावर नक्की काय होईल ? दुर्गा आणि सरस्वती एकमेकांना भेटतील का ? सरू आणि मोठ्या मालकांची भेट होणार ? दुर्गा आणि सरस्वती जर समोरासमोर आले तर? पुन्हा नव्याने सरू आणि राघवचा संसार सुरु होईल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बऱ्याच महिन्यांनी सरस्वती कैकालीमध्ये परतणार आहे. सरस्वतीला स्वप्नामध्ये दिसत असलेल्या जागांचा संदर्भ गावामध्ये परतल्यावर लागेल का? कैकालीच्या मंदिराला सरस्वती ओळखू शकेल का? हे बघणे रंजक असणार आहे. 


 

Loading...
SHARE