घाडगे & सून मालिकेमध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री !

कलर्स मराठीवर सध्या सुरु असलेली घाडगे & सून ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घाडगे & सून मध्ये बऱ्याच घटना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या. घाडगे सदन मध्ये माई आणि आण्णा यांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस अमृताने खूप जोश्यात आणि उल्हासात साजरा केला. ज्यामध्ये सगळ्यांनाच अक्षयची कमतरता भासली. आण्णा यांनी अक्षयला घाडगे सदन मधूनच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातून बेदखल केले याचा खु मोठा धक्का घरच्यांना आणि अक्षयला बसला. अमृता आता घाडगे परिवारामध्ये रुळू लागली आहे. वसुधाच्या कुरघोडी सुरूच आहेत पण माईची खंबीर साथ असल्याने या अडचणीला देखील ती खंबीरपणे तोंड देत आहे. या सगळ्या घटना मध्ये आता मालिकेमध्ये एक नवी एन्ट्री लवकरच होणार आहे. मालिकेच्या नुकत्याच सुरु झालेल्या काही प्रोमोज मधून अवघ्या महाराष्ट्राचे मनं जिंकलेला ऋषी प्रेक्षकांना एका नव्या अंदाज मध्ये बघायला मिळाला आहे. या प्रोमो मध्ये अमृता आणि ऋषी एकमेकांना पहिल्यापासूनच ओळखत आहे असे समजते.

तेंव्हा ऋषीच्या मालिकेमध्ये येण्याने मालिकेला आणि अमृता – अक्षयच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? हे तर प्रेक्षकांन मालिका बघितल्यावरच कळेल. बघायला विसरू नका घाडगे & सून रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Loading...
SHARE