Nakushi ~ A Star Pravah’s Upcoming Serial

nakushi-star-pravah-serial

लक्षवेधी नकुशी

वास्तवाचं नेमकं चित्रण हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट  मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या वाहिनीवरील ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ या नव्या मालिकेचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

अलीकडच्या काळात टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेतून भरून निघणार आहे. स्टार प्रवाहनं प्रदर्शित केलेल्या या छोट्या टीजरमधूनच मालिकेचं वेगळेपण जाणवत आहे. हा टीजर पाहून मालिका सामाजिक पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या लक्षवेधी टीजरमुळे मालिकेची कथा, कलाकार या विषयीची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.

Read This Article In English —> Click Here


 

 

 Loading...
SHARE