फ्रेशर्स या युथफूल मालिकेचे १०० भाग पूर्ण

Freshers To Complete A Century Of Episodes !

फ्रेशर्स या युथफूल मालिकेचे १०० भाग पूर्ण

झी नेटवर्क्सच्या नव्या वाहिनी झी युवा वरील अत्यंत युथफूल आणि मनोरंजक मालिका ‘फ्रेशर्स’ २२ ऑगस्ट २०१६ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या मालिकेचा आज १००वा भाग आज सायंकाळी ७ वाजताप्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील वेग-वेगळ्या भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलेल्या ७ तरुणांच्या स्वप्नांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. खूप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कलाकार ओंकार राऊत, मिताली मयेकर, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, सिद्धार्थ खिरीड आणि शुभंकर तावडे यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. ड्रीमिंग ट्वेन्टीफोरसेव्हन निर्मित फ्रेशर्स ही मालिका आपल्यातील प्रत्येकाच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देण्यात यशस्वी ठरली आहे.

प्रेक्षकांनी या मालिकेला अगदी पहिल्या भागापासूनच पसंती दर्शवली आहे आणि आज फ्रेशर्सने १०० भागांचा पल्ला गाठल्याचा निमित्ताने फ्रेशर्सच्या सेट वर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. हि मालिका अशीच प्रेक्षकांना मनोरंजित करत राहील यात शंकाच नाही.


 

Loading...
SHARE