‘लागीरं झालं जी’मध्ये शीतलीची पहिली वटपौर्णिमा

Lagira Jhal Ji Vatpournima Photos

जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.

लग्नानंतर शीतल तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. वटपौर्णिमेचे व्रत म्हणजे विवाहित स्त्रियांसाठी सौभाग्याचं लेणं. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण वटपौर्णिमेच्या दिवशी लागीरं झालं जी मध्ये प्रेक्षक एक वेगळं वळण पाहू शकणार आहेत. अजिंक्यची पोस्टिंग व्हायच्या आधी शीतल आणि अजिंक्यच्या लग्नाला बार उडवून दिला जातो. अनेक उतार चढावांना समोर जात शीतल आणि अजिंक्य त्यांचा संसार आणि घरची एकंदर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इतक्यातच वटपौर्णिमेच्या दिवशी अजिंक्यच्या पोस्टिंगचं पत्र येतं. आता कुठे एकत्र आलेले दोन प्रेमी जीव अजिंक्यला देशसेवेसाठी सीमेवर जावे लागत असल्यामुळे परत दुरावणार या विचाराने शीतल थोडी अस्वस्थ होते. पण जो पर्यंत अजिंक्य गावी आहे तो पर्यंत त्याचा सगळा वेळ तो शीतलला द्यायचं ठरवतो. शीतल आणि अजिंक्यचा सुखी संसार असाच सुरळीत चालू राहील का? त्या दोघांच्या आयुष्यात अजून कुठले वळण येईल? हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.

Loading...
SHARE