‘वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या’ – मनोरंजनाचं वादळ परत येतंय..

Zee Marathi’s Chala Hawa Yeu Dya returns with a Bang!

‘वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या’ – मनोरंजनाचं वादळ परत येतंय

तमाम मराठी प्रेक्षकांना दर सोमवारी आणि मंगळवारी जो प्रश्न ऐकायची सवयच लागलीये तो प्रश्न म्हणजे हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण सुरु होतोय चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा. ‘जिथे मराठी तिथे झी मराठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करत असलेल्या झी मराठीने या विश्व दौऱ्याच्या निमित्ताने जगाच्या नकाशावर एक धाडसी पाऊल टाकलं आहे. चला हवा येऊ द्या म्हणजे मराठी प्रेक्षकांचं हक्काचं मनोरंजन. मनोरंजनाचं हे वादळ आता पुन्हा परत येतंय. येत्या ८ जानेवारीपासून चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा सुरु होत आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या विश्वदौऱ्यात चला हवा येऊ द्याची टीम आपल्यासोबत प्रेक्षकांना जगाची सफर घडवणार आहे. चला हवा येऊ द्याने आत्तापर्यंत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. पोस्टमन काका, शांताबाई, जज, वकिल, मामा भाचे, वादघाले सासू सून, पुणेरी बाई अशी वेगवेगळी पात्र आपल्या जगण्याचा भाग बनली. मराठी सिनेमा आणि नाटकांसाठी या कार्यक्रमाने हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. पत्रांच्या माध्यमातून हसवता हसवता अंतर्मुख केलं. आणि आता जगाच्या नकाशावर मोहोर उमटवायला ही सतरंगी मंडळी सज्ज आहेत.

८ जानेवारीपासून सुरु होत असलेल्या चला हवा येऊ द्या विश्वदौऱ्याचं पहिलं स्टेशन आहे दुबई आणि अबुधाबी. कॉमेडीची आतषबाजी तर होणारच आहे शिवाय बॉलिवूड पार्क, फेरारी वर्ल्ड अशा अनेक ठिकाणांची सफर ही टीम प्रेक्षकांना घडवणार आहे. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांसोबत दुबई अबुधाबी दौऱ्यात खास पाहुणी म्हणून येत आहेत जाडूबाईची टीम अर्थात निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे. या दोन धमाल अभिनेत्रींसोबत विश्वदौऱ्याचा पहिला भाग रंगणार आहे. विश्वदौऱ्याच्या पुढील भागांमध्ये सुद्धा झी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकांमधले तुमचे लाडके चेहरे दिसणार आहेत.

Zee Marathi’s Chala Hawa Yeu Dya returns with a Bang!

स्टुडिओची चौकट मोडून जगाची सफर करणारा मराठी टेलिव्हिजनवरचा हा पहिलाच कॉमेडी शो ठरावा. दुबई अबुधाबी पाठोपाठ लंडन, पॅरिस, जपान, सिंगापूर, बाली, मॉरिशस, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युएसए अशा जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांत धुमाकूळ घालायला ही टीम सज्ज आहे. तेव्हा ८ जानेवारीपासून प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वा. करा जगाची सफर तुमच्या लाडक्या चला हवा येऊ द्यासोबत कारण जिथे मराठी तिथे झी मराठी.

Loading...
SHARE