सेकंड लाईफ (Marathi Short Film)

second-life-short-film

Movie चा विषय कसा सुचला?

SECOND LIFE  चा विषय हा माझे मित्र Ajit Chavan यांनी सुचवला होता. त्यांचा सख्खा चुलत भाऊ Vishwajeet Chavan आणि माझा चांगला मित्र वयाच्या 21 व्या वर्षी Bike accident मध्ये मरण पावला होता जो कि त्याच्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा होता. ऐन एकविशीत तरुण मुलगा जाणं, आई-वडील आणि कुटुंबातील इतरांसाठी मोठा धक्का होता. 3-4 वर्ष उलटून गेली तरीही अजून कोणी त्यातून सावरलेलं दिसलं नव्हतं. या सगळ्या घटनेला मी खूप जवळून बघितलंय आणि अनुभवलंय सुद्धा.

विषयासाठी Research केला होता का?

प्रत्येक सणासुदीला इतरांच्या घरी Celebration सुरु असताना यांच्या घरी आजही भयाण शांतता असते. तेच Short film च्या माध्यमातून मांडण्याची Ajit Chavan यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. ही वेळ इतरांवर येऊ नये असं आम्हा दोघांनाही वाटत होतं. ही गोष्ट लिहित असताना RTO आणि संबंधित विभागाकडून माहिती घेऊन त्यावर बराच Research करण्यात आल्यानंतर भयानक वास्तव समोर आलं.

Short film म्हणजे Director Profile की Social Awareness?

भारतामध्ये आजारी पडून जितके लोक मरण पावतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त Road accident मध्ये मरण पावतात. त्याची कारणंंही शोधली आणि उपायही शोधले. मग एका गोष्टीमधून हे सगळं SECOND LIFE मध्ये मांडलं.

ही Short Film बनवण्यामागचा उद्देश फक्त आणि फक्त Social Awareness एवढाच आहे. त्यामुळे समाजातील ज्यांना शक्य असेल त्यांनी हि film Share करून आपआपला खारीचा वाटा उचलावा असं वाटतं.
SECOND LIFE  हा माझ्यासाठी लेखक दिग्दर्शक म्हणून फक्त Project नाहीय तर यात माझी एक Emotional Attachment आहे. आणखी एक गोष्ट… या project मधून माझा किंवा निर्मात्यांचा उद्देश नाव किंवा पैसा कमावणं हा मुळीच  नाही.

या Short Film मुळे हा विषय कुठवर पोहचला आहे?

फक्त या Short film मुळे Traffic Rules Follow करण्याची छोटीशी सुरुवात जरी झाली आणि एका व्यक्तीचा जरी जीव वाचवू शकलो तरी Team SECOND LIFE चा उद्देश आणि मेहनत सफल झाल्याचं वाटेल आणि त्यातून मिळणारं समाधान हे निश्चितपणे शब्दात मांडता येणारं नसेल.

Shooting चा Experience कसा होता?

या Short Film च पूर्ण Shooting Navi Mumbai च्या Koparkhairne आणि Vashi या भागात पूर्ण झालं आहे. Shooting करताना सगळ्यात जबाबदारीचं  काम म्हणजे Bike वेगात चालवायची होती. त्यासोबत मर्यादित Equipment मध्येच Shooting करायचं होत. Road वर त्याचा इतर कोणालाही त्रास व्हायला नको ह्याचीसुद्धा खबरदारी घ्यायची होती. Shooting पण Permission मिळालेल्या वेळेत पूर्ण करायचं होतं. पण Planning नुसार सगळं झाल्यामुळे खूप मजाही आली.

यातले बरेच Stunt मुख्य भूमिका play करणारया Ajay Chavan या कलाकाराने केले आहेत आणि बाकीचे Stunt Rohit Patil चे आहेत. त्याच बरोबर 8-9 कलाकारांनी या Short Film मध्ये काम केल आहे.

Short Film चे अर्थकारण कसे असते?

Facebook आणि Whatsapp चे कित्येक मोठ मोठे Pages/Group या Short Film ची Share करण्यासाठी मागणी करत आहेत. लवकरच CafeMarathi च्या YouTube Channel वर आणि इतर Social media वरती SECOND LIFE पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना ते आवडेलसुद्धा याचा विश्वास वाटतो.

Read This Article In English —> Click Here


Short Film :


 

Loading...
SHARE