रॅपर डॅनी सिंगचे “दारू पीने दे” सोशल मीडियावर हिट

यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या युवा पिढींमध्ये जास्त क्रेज पाहायला मिळते आहे. पाश्चिमात्य देशातून आलेला ‘रॅप’ गाण्यांचा हा प्रकार आपल्या भारतात हिट होताना दिसत आहे. नुकतंच डॅनी सिंग यांनी गायलेले “दारू पीने दे ” हे रॅपसॉंग सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेले हे गाणे आजच्या तरुणाईला आपल्या तालावर थिरकवायला लावणारे असे आहे. डॅनी सिंग याच्या “दारू पीने दे” या गाण्याला सोशल मीडियावर वन मिलियन्स व्हीव्यूज आहेत. डॅनी सिंग याचे याआधी  “आयटमगिरी” मराठी- हिंदी फ्युजन असलेलेरॅप सॉंगसुद्धा तरुणाईमध्ये फारच चर्चेत आहे.

 

डॅनी सिंग आणि आशिष या दोघांनी मिळून या गाण्याला संगीत दिले आहे. यातील गाण्याचा भाग हा आशिष यांनी गायला असून त्यातील रॅपचा भाग डॅनी यांनी गायला आहे. त्याचप्रमाणे  हे गाणे अधिक रेखीव दिसण्यासाठी  ऐश्वर्या जाधव यांनी कोरिओग्राफी केली आहे.  व्हीजे प्रॉडक्शन या बॅनरखाली डँनी सिंग यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. अनंत घेरे तसेच रवींद्र सरोवर यांनी व्हिडीओ सॉंगचे दिग्दर्शन केले आहे. ऐश्वर्या जाधव यांनी या गाण्याची केलेली कोरिओग्राफी ही फार उत्तम आहे. या गाण्यांचे शूटिंग एका दिवसात करण्यात आले. रॅपर डॅनी सिंग यांचे हे गाणे देखील तरुणाईला थिरकवल्याशिवायराहूच शकत नाही.


 

Loading...
SHARE