गुलाबी दिवसांच्या आठवणी होणार जाग्या.. ‘अॅटमगिरी’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज..

शाळेतले आणि कॉलेजचे ते दिवस म्हणजे वहीच्या शेवटच्या पानासारखे असतात. वहीच्या आत मोरपीस लपवून ठेवावा तशा या दिवसांच्या अनेक गोष्टी आपण आपल्या मनात आजवर साठवल्या आहेत. असे हे मंतरलेले दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील गुलाबी दिवस. याच गुलाबी दिवसांची आठवण करून देणाऱ्या अॅटमगिरी या मराठी सिनेमाचा Trailer नुकताच प्रदर्शित झाला आहे. A.R.V Production आणि Aviraj Production यांची संयुक्त निर्मिती असलेल्या Itemgiri या सिनेमाचे दिग्दर्शन Pradip Tonge आणि Mangesh Shendge यांनी केले आहे.

Itemgiri चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता Hansraj Jagtap आणि Fandry फेम Rajwshwari Kharat यांची प्रमुख भूमिका आहे. शिवाय Milind Shinde, Chhaya Kadam, Ramchandra Dhumal, Dhanshri Meshram, Amit Taware, Suraj Takke यांच्या देखील लक्ष्यवेधी भूमिका आहेत. Rohit Nagbhide आणि Shankar Pawar यांनी सिनेमाला संगीत दिले असून Aadarsh Shinde, Aarya Ambekar,Shankar Pawar, Prem Kotwal यांच्या आवाजातील गाणी तरूणाईला आवडतील अशीच आहेत.

Itemgiri Marathi Movie Poster

Itemgiri… हा शब्द तमाम युवा पिढीच्या जवळचा आहे. परंतु सिंनेमात तो सकारात्मक पद्धतीने असल्याचे मत दिग्दर्शक Pradip Tonge यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे सांगतात कि, सिनेमात कॉलेजची मौज-मजा, दंगा-मस्ती तर आहेच परंतु जाता जाता हळूवारपणे एक सामाजिक संदेश देखील देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सिनेमा गुलाबी दिवसांच्या आठवणी जागवताना विचार करायला देखील लावणार अशी आम्हाला खात्री आहे. सिनेमाचे निर्माते Amit Taware, Vikas Mudanda,Rahul Boob, Pradeep Beldare, Sachin Nidge, Santosh Kadam आणि Arvind Chandak आहेत.


 

Loading...
SHARE