सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात

Sanskruti Kala Darpan

सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवाचा दि. ६ एप्रिल रोजी दिमाखात शुभारंभ झाला. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात होत असलेल्या या महोत्सवाचा श्रीगणेशा मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आला. या महोत्सवात विश्वास जोशी, विजय पाटकर, अभिजित पानसे, स्मिता जयकर, रेखा सहाय, मिलिंद गवळी, अमृता राव, समृद्धी पोरे आणि आशुतोष घोरपडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सिनेरसिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ प्रारंभ झालेल्या या चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘नटसम्राट’ या चित्रपटाने झाली. विशेष म्हणजे हा चित्रपट रसिकांना निशुल्क पाहण्याची संधी मिळाली.

यंदाच्या वर्षी चित्रपट विभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती.त्यापैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंगा पतंगा,कोती, डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली आहे. चित्रपट विभागातील ज्युरी मंडळात असलेल्या श्रावणी देवधर, दीपक देऊळकर, समृद्धी पोरे, अभिजित पानसे, अमित भंडारी आणि अमृता राव यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकार मंडळींसोबत खेळ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळत असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होत आहे.

चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार आहे.

Read This Article In English —-> Click Here

 

दिनांक  चित्रपटाचे नाव वेळ 
६ एप्रिल २०१६नटसम्राटसकाळी १०. ५ वा
६ एप्रिल २०१६ख्वाडादुपारी १. ०० वा.
६ एप्रिल २०१६हलालदुपारी ३. १५ वा.
६ एप्रिल २०१६मितवासं. ५. ३० वा
६ एप्रिल २०१६देऊळ बंदरात्री ८. ०० वा
७ एप्रिल २०१६संदूकसकाळी १०. ००
७ एप्रिल २०१६रंगा पतंगादुपारी १२. १५ वा.
७ एप्रिल २०१६कोतीदुपारी २.३० वा.
७ एप्रिल २०१६डबल सीटसं. ५. ०० वा
७ एप्रिल २०१६दगडी चाळसं. ७ ०० वा
७ एप्रिल २०१६कट्यार काळजात घुसलीरात्री ९. ३० वा.
Loading...
SHARE