दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सईच्या चाहत्यांचं एक पाऊल पुढे

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशन ही संस्था झटते आहे. या संस्थेला अनेक कलाकार तसेच जनतेचं सहकार्य लाभलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ऑनलाईन नाव नोंदणी करून प्रत्येक गावात पाणी फाऊंडेशनने श्रमदानाचे आयोजन केले होते. त्यासाठी अनेक कलाकारांनी आणि लोकांनी पुढाकार घेतला. त्यात सई ताम्हणकरचा चाहता वर्ग म्हणजेच सईहॉलीक्स यांचा देखील सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील निरगुडे गावात या सईहॉलीक्सनि श्रमदान केलं. सई ताम्हणकर या श्रमदानात सहभागी होऊ शकली नाही म्हणून तीच प्रतिनिधित्व या सईहॉलीक्सनी केलं. त्यांचे हे योगदान खरंच कौतुकास्पद आहे.

Loading...
SHARE