फ्रेशर्सचे फ्रेश न्यू इयर रिजोल्यूशन

Freshers Make Fresh Resolutions For 2017

फ्रेशर्सचे फ्रेश न्यू इयर रिजोल्यूशन

आपल्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देणाऱ्या फ्रेशर्स या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका पाहताना प्रत्येक पात्र हे आपल्यातलंच एक आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या फ्रेशर्सचे नवीन वर्षाचे संकल्प काय आहेत हे जाणून घेऊया.

मिताली मयेकर – मला नुकत्याच आलेल्या काही अनुभवांवरून मी असं ठरवलंय की मी या पुढे कुठल्याही व्यक्तीला पटकन जज नाही करणार. त्या व्यक्तीबद्दल मला काही पर्सनल एक्सपीरिअन्स आल्यावरच मी त्यांच्या बद्दल माझं मत बनवेन.

शुभंकर तावडे – आपण सहसा सण आणि त्यांचं सेलिब्रेशन लाऊड म्युजिक सोबत करतो आणि त्या सेलिब्रेशनचा मनमुराद आनंद घेतो पण आपल्या या अशा सेलिब्रेशनचा जे लोक भाग नसतात त्यांना मात्र त्याचा खूप त्रास होतो. म्हणूनच वाढत्या एअर पोल्युशनला आळा घालण्यासोबतच मी ठरवलं आहे की मी येत्या नवीन वर्षात ध्वनी प्रदूषण थांबवण्याचा आणि निरोगी वातावरण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. ‘पर्यावरणवादी होणे’ हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे.

अमृता देशमुख – येणाऱ्या नवीन वर्षात मी खूप पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला आहे. शूटिंग आणि बिझी शेड्युलमुळे मला वाचनाला वेळ देता येत नाही आहे म्हणून मी २०१७ मध्ये माझ्या वाचनाला देखील वेळ देण्याचं ठरवलं आहे.

रश्मी अनपट – आजकाल आपल्या फास्ट पेस लाइफस्टाईलमुळे आपण हेल्थकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणून माझा नवीन वर्षाचा संकल्प असा आहे की मी फ्रेश आणि हेल्थी पदार्थच खाणार. तसंच व्यायाम आणि मेडिटेशन नियमितपणे करणार. मुळात या बिझी शेड्युलमधून जो वेळ स्वतःसाठी देणं जमत नव्हतं तर तो वेळ मी स्वतःला येत्या नवीन वर्षात देण्याचं ठरवलंय.

ओंकार राऊत – २०१७ या नव्या वर्षासाठी माझे २ महत्वाचे संकल्प असे आहेत की मी नखं खाण्याची सवय सोडणार तसेच सर्व ठिकाणी वेळेत पोहोचणार कारण punctualityही खूप महत्वाची आहे. त्याचसोबत या नव्या वर्षी मी खूप लिहिण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्यके महिन्यात किंवा २ महिन्यातून एक झाड लावण्याचं मी ठरवलंय.

रसिका वेंगुर्लेकर –२०१७ मध्ये या बिझी शेड्युलमधून मी माझ्या आवडत्या गोष्टी जस की पुस्तकं वाचणे, लिखाण करणेयासाठी वेळ काढण्याचं ठरवलं आहे. तसंच मला माझं भरतनाट्यम अरंगेत्रम पूर्ण करायचं आहे. त्याचसोबत मला २०१७ मध्ये उर्दू भाषा शिकायची आहे.

सिद्धार्थ खिरीड – आजकालच्या हेक्टिक आणि बिझी शेड्युलमुळे तसंच स्ट्रेसमुळे आपण रोजच्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना मुकतो. त्यामुळे मला २०१७ हे नवीन वर्ष माझ्यासाठी अजून जास्त युथफूल, ऍक्टिव्ह बनवायचं आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचे क्षण अनुभवायचे आहेत.

 


 

Loading...
SHARE