मराठी कलाकारांची फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट

marathi-celebrities-visited-facebook-headquarters-at-mumbai

मराठी कलाकारांची फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट

मराठी कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांना जोडून ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावरील कलाकारांचे पोस्ट्स फॅन्सना त्यांच्याबद्दल अपडेटेड ठेवतात. फेसबुक ही सर्वात यूजर फ्रेंडली आणि सर्वांची आवडती सोशल नेटवर्किंग साईट आहे आणि या सोशल नेटवर्किंग साईटचा अधिक उत्तमरीत्या वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो याबद्दल फेसबुकने मराठी कलाकारांसाठी एक वर्कशॉप आयोजित केले होते. ड्रीमर्स पीआर अँड मार्केटिंग मॅनेज करत असलेल्या कलाकारांपैकीसंजय जाधव, मयुरी वाघ, चिराग पाटील, भूषण पाटील, सायली पंकज आणि उमेश जाधव या कलाकारांनीफेसबुकवर्कशॉपला हजेरी लावली. फेसबुक मुंबई हेडक्वॉर्टरला भेट देणारे हे पहिले मराठी कलाकार असून या वर्कशॉपचे आयोजन करण्यात मराठी सिनेसृष्टीतील पहिलीमराठी सेलिब्रिटी मॅनेजमेंट एजन्सीड्रीमर्स पी.आर. अँड मार्केटिंगचा विशेष सहभाग होता.

Read This Article In English —->  Click Here


 

Loading...
SHARE