‘अॅटमगिरी’ चित्रपटाचे संगीत अनावरण

Itemgiri Marathi Movie Music Launch at Shaniwarwada

सुरवातीपासूनच बहुचर्चित असलेल्या अॅटमगिरी या चित्रपटाचे संगीत अनावरण नुकतेच पुण्यातील शनिवार वाडा पटांगणात  करण्यात आले. या प्रसंगी पुण्यनगरीच्या महापौर मुक्ता टिळक, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, समाजसेवक डॉ. मिलिंद भोई, राजाभाऊ कदम, संतोष हावाळे  राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगपात व फँन्डी फेम राजेश्वरी खरात धनश्री मेश्राम, माननी दुर्गे, सुरज टक्के, शशी ठोसर,छाया कदम, अमित तावरे  आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटातील गीते प्रदीप कांबळे, निलेश कटके, गजानन पडोल, प्रदीप कांबळे यांनी लिहली आहेत. तर  या चित्रपटातील गीतांना पी शंकरम् यांनी संगीत दिले असून आर्या आंबेकर, पी शंकरम्,आदर्श शिंदे, प्रेम कोतवाल यांचा स्वर लाभला आहे. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

किशोरवयीन वयातील प्रेमाचा ठाव या चित्रपटात घेतला असून एक वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातून रसिकांना अनुभवता येणार आहे.  ए. आर. व्ही व अविराज प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे निर्माते विकास मुंदडा, अरविंद चांडक,राहुल बुब, अमित तावरे, प्रदीप बेलदरे, सचिन निगडे, संतोष कदम त्याच बरोबर दिग्दर्शक प्रदीप टोणगे व मंगेश शेडगे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दुबाले पाटील तर प्रसिद्धी प्रमुख रामकुमार शेडगे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अॅटमगिरी हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील रसिकांना आवडेल असे मतं चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांनी सांगितले.


 

Loading...
SHARE