अमृताच्या वाढदिवसाचं अनोख आणि खास सेलिब्रेशन

amruta-celebrates-her-birthday-in-a-unique-way

अमृताच्या वाढदिवसाचं अनोख आणि खास सेलिब्रेशन

चाहत्यांसाठी त्यांच्या आवडत्या कलाकाराचा वाढदिवस म्हणजे एक पर्वणीच असते. असंच काही अमृता खानविलकर हिच्या चाहत्यांबद्दल झालं आहे. अमृताचा वाढदिवस तिच्यासाठी मेमोरेबल आणि स्पेशल बनवण्यासाठी तिच्या फॅनक्लबने एक खास आयोजन केलं. अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनीगोरेगाव येथील डिझायर सोसायटी या अनाथ मुलांची काळजी घेणाऱ्या NGO ला भेट दिली. अमृता खानविलकरने स्वतः तिथे उपस्थित राहून तेथील मुलांसोबत वेळ घालवला. टीम अमृता आणि अमृता खानविलकर यांनी मिळून त्या मुलांना काही भेटवस्तू दिल्या. अमृता खानविलकर हिला भेटून खुश झालेल्या मुलांनी तिच्या समोर आपल्या कला सादर केल्या. अमृताच्या चाहत्यांनी तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या लहानग्यांसाठी हा दिवस खास बनवला. मजा मस्ती आणि गप्पा गोष्टींनी रंगलेला अमृताचा हा वाढदिवस मोस्ट स्पेशल आणि लक्षात राहील असा होता यात शंकाच नाही.

Read This Article In English —> Click Here


 

Loading...
SHARE