हे अभिनेते कसे करतात एवढे धोकादायक स्टंट्स येथे समजेल तुम्हाला !

सध्या बॉलीवूडमध्ये अ‍ॅक्शन पट बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. ज्यामध्ये सर्वांचे आवडते अभिनेते ॲक्शन करताना दिसतात. कित्येकदा चित्रपटांमध्ये अभिनेते उंच इमारतीवरून उड्या मारताना दिसतात, चालत्या ट्रेन मधून उड्या मारताना दिसतात तसेच एका छतावरून दुसऱ्या छतावर बिनधास्त उड्या मारतात. हे सर्व स्टंट बघताना प्रेक्षक दंग होऊन जातात. परंतु हे सर्व स्टंट बहुतेक वेळा स्टंटमॅन करतात. या स्टंटमॅन ना हिरोचे बॉडी डबल म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला या लेखातून अशा कलाकारांच्या बॉडी डबल बद्दल माहिती सांगणार आहोत.

सलमान खान – बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हा कित्येकदा त्या चित्रपटांमध्ये स्टंट करताना दिसतो. सलमानने कित्येकदा त्यांच्या चित्रपटांमधून खतरनाक स्टंट केलेले दिसतात. सलमानच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांमध्ये खूप सारे स्टंट होते. परंतु या दोन्ही चित्रपटांमध्ये सलमान ऐवजी त्याच्या बॉडी डबले म्हणजेच विजयने हे स्टंट केले होते.
ऋतिक रोशन – ऋतिक रोशन चा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. त्याची बॉडी डान्स लुक या सर्वच गोष्टीवर त्याचा चाहता वर्ग फिदा असतो. हृतिकने सुद्धा त्याच्या कित्येक चित्रपटांमध्ये खतरनाक स्टंट केले आहे. धूम २ ,मोहनजोदाडो, बँग बँग यासारख्या चित्रपटांमध्ये त्याचे असे खतरनाक स्टंट दिसले होते. तसे बहुतेक चित्रपटांमध्ये ऋतिक स्वतःचे स्टंट स्वतः करतो परंतु मोहनजोदाडो व बँग बँग या चित्रपटांच्या वेळी त्याला बोडी डबल ची गरज भासली होती. या चित्रपटांमध्ये त्याचा बोडी डबल आमिर खान या आर्टिस ने केला होता.
शाहरुख खान – बॉलिवूडचा रोमँटिक हिरो म्हणून शाहरुख खान ला ओळखले जाते. शाहरुखचे ॲक्शन चित्रपटांपेक्षा रोमँटिक चित्रपट अधिक आहेत. परंतु काही चित्रपटांमध्ये शाहरुख स्टंट करताना दिसतो. शाहरूख हा सर्वात शेवटी २०१८ मध्ये झिरो हा चित्रपट आला होता त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसला नाही. या चित्रपटामध्ये शाहरूख स्टंट करताना दिसला होता परंतु खरे तर हे स्टंट शाहरुखने न करता त्याच्या बॉडी डबल केले होते. याशिवाय फॅन, चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा शाहरुखच्या बॉडी डबल त्याच्या बदली स्टंट केले आहेत.
अक्षय कुमार – अक्षय कुमारचा चित्रपटांमध्ये असलेले स्टंट हे स्वतःचे स्वतः करणे पसंत करतो असे इंडस्ट्रीमध्ये म्हटले जाते. आणि हे खरे सुद्धा आहे. परंतु काही चित्रपटांमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने काही खतरनाक स्टंट हे अक्षयला करायला दिले जात नाहीत. मग त्याच्या जागी हे स्टंट त्याची बॉडी डबल करतो. चांदणी चौक टू चायना या चित्रपटांमध्ये असलेले स्टंट करण्यासाठी अक्षयला त्याच्या बोडी डबलने मदत केली होती.
अमीर खान – अभिनेता अमीर खान ला बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते. कारण आमिर त्याची प्रत्येक भूमिका एकदम परफेक्ट व चोख निभावून पडद्यावर साकारतो. परंतु अमीरला सुद्धा काही वेळेस बॉडी डबलची मदत घ्यावी लागते. धूम ३ या चित्रपटांमध्ये आमिरचे काही स्टंट त्याच्या बॉडी डबलने केले होते.